(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : दिवाळीआधी वजन कमी करायचं असेल तर 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करा; आठवड्याभरातच फरक जाणवेल
Health Tips : आजकाल वाढते वजन ही अनेकांसाठी समस्या बनली आहे. हे कमी करण्यासाठी लोक विविध उपाय करतात.
Health Tips : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यासाठी सगळ्यांचीच दिवाळीच्या तयारीसाठी लगबग सुरु आहे. भरपूर खरेदी सुरू आहे. दिवाळीत सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी देखील अनेकांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र, काही लोकांना वाढलेल्या वजनामुळे त्रास होतोय. अशा लोकांना सणासुदीच्या काळात कपड्यांचा खूप विचार करावा लागतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला दिवाळीआधी वजन कमी करून स्वतःला फिट बनवायचं असेल, तर तुमच्या आहारात या 5 पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल आणि सणासुदीत तुम्ही अगदी फीट दिसू शकाल.
5 पदार्थ जे वजन लवकर कमी करतात
चीज
वजन कमी करण्यासाठी आरोग्य तज्ञ आहारात चीज समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. प्रथिने आणि फायबरने भरपूर असलेले चीज शरीराला पोषक तत्त्वे पुरवते आणि पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. चीज चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यास मदत करू शकते. हे कोणत्याही स्वरूपात खाल्ले जाऊ शकते.
फळे
फळे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर मानली जातात. त्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. वजन कमी करण्यासाठी फळे खूप प्रभावी आहेत. त्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ काढून वजन कमी करण्यास मदत करतात. तुमच्या आहारात संत्री, सफरचंद, लिची आणि चेरी या फळांचा समावेश करून तुम्ही वजन कमी करू शकता.
कडधान्य
जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल तर कडधान्य तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात. हे असे आहे ज्यामध्ये कमी प्रमाणात कॅलरीज असतात. याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरातील चरबीही वाढत नाही. कडधान्य पचनशक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. रोज सकाळी नाश्त्यामध्ये मोड आलेले मूग खाणे फायदेशीर मानले जाते.
ऍपल सायडर व्हिनेगर
ऍपल सायडर व्हिनेगर देखील वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हे चयापचय वाढवून शरीरातील अतिरिक्त फॅट जाळण्यास मदत करते. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
चिया सीड्स
चिया सीड्स वजन कमी करण्यासाठी उत्तम अन्न मानले जातात. प्रथिने आणि फायबर समृद्ध चिया सीड्सचे सेवन केल्याने वजन झपाट्याने कमी होऊ शकते. हे असे अन्न आहे, जे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे जास्त भूक लागत नाही. एक चमचा चिया सीड्स एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा. यामुळे वजन खूप लवकर कमी होऊ शकते.