एक्स्प्लोर

डोळ्यांची काळजी घ्या! स्क्रिनटाईम वाढलाय, 'ही' लक्षणं दिसत असतील तर लगेच डोळे तपासा

अनेकदा डोळ्यांना जाणवणाऱ्या छोट्या-छोट्या समस्या आपण सामान्य समजतो. पण या छोट्या समस्या पुढे जाऊन गंभीर ठरू शकतात.

मुंबई : आपल्या शरीराचा एक महत्वाचा अवयव म्हणजे डोळे.  डोळ्यांमुळेच आपण सभोवतालचं जग पाहू शकतो. पण अनेकदा डोळ्यांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्षं करतो. अनेकदा डोळ्यांना जाणवणाऱ्या छोट्या-छोट्या समस्या आपण सामान्य समजतो. पण या छोट्या समस्या पुढे जाऊन गंभीर ठरू शकतात. तसेच दैनंदिन जीवनात सतत कम्प्युटर स्क्रीनवर काम करणं, मोबाइलचा सतत उपयोग करणं, टीव्ही पाहणं किंवा वाचणं यांमुळे डोळे थकतात. आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्याकडे दुर्लक्षं करणं महागात पडू शकतं. तसेच ही लक्षणं दिसून आली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.

हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी दररोज ब्रश करणं ठरतं फायदेशीर; संशोधनातून खुलासा

डोकेदुखीचा त्रास होणं
अनेकदा डोकेदुखीचा त्रास सतावतो. अशातच त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी काही औषधं घेतली जातात. पण औषधांचाही काहीच उपयोग होत नाही आणि डोकेदुखीचा त्रास पुन्हा सतावू लागतो. पण अशातच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. अनेकदा डोकं दुखण्याचं कारण डोळेही असू शकतात. डोळ्यांच्या समस्या कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल किंवा टिव्ही स्क्रिन समोर सतत बसल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो.

ऑफिसमध्ये कामाची शिफ्ट सतत बदलतेय?; होऊ शकतात 'हे' आजार

धुरकट दिसणं
वाढत्या वयानुसार डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. परंतु, अनेकदा कमी वयातच डोळ्यांना सूज येणं, धुरकट दिसणं यांसारख्या समस्या जाणवू लागतात. अनेकदा या समस्येकडे अशक्तपणाचं लक्षण समजून दुर्लक्ष केलं जातं. परंतु, या समस्येकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. धुरकट दिसणं एखाद्या आजाराचं लक्षणं असू शकतं. हे डोळ्यांच्या रेटिन्यालाही नुकसान पोहोचवू शकतं. अशा परिस्थितीत लगेच डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे.

शरीरातील आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी खा 'हे' सुपरफूड्स

डोळ्यांना थकवा जाणवणं
तुमच्या डोळ्यांना सतत थकवा जाणवत असेल तर तज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. अनेकदा डोळ्यांशी निगडीत आजारांचं लक्षण असण्याचीही शक्यता असते.

टीप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaZero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget