Health Tips : मनुका मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर की घातक? वाचा संपूर्ण माहिती
Health Tips : हेल्थलाइनच्या मते, मधुमेहाचा त्रास असलेले लोक त्यांच्या आहारात मनुका समाविष्ट करू शकतात. मात्र, मनुक्याचे सेवन कमी प्रमाणात असावे.
Health Tips : मनुका हा ड्रायफ्रूट्समधीलच एक महत्त्वाचा आहे. मनुक्याचा वापर बहुतेक गोड पदार्थात केसा जातो. याशिवाय तुम्ही मनुके नुसतेही खाऊ शकता. ज्यांना त्यांच्या आहारात सोप्या पद्धतीने अधिक पोषक तत्वांचा समावेश करायचा आहे त्यांच्यासाठी मनुका हा एक चांगला पर्याय आहे. मनुक्यात लोह, प्रथिने आणि फायबर आढळतात. त्यामुळे ते खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. मात्र, ज्यांना मधुमेह आहे त्यांनी मनुका खावे का? याचा मधुमेही रुग्णांवर वाईट परिणाम होतो का? असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मधुमेही रुग्ण मनुके खाऊ शकतात का?
हेल्थलाइनच्या मते, मधुमेहाचा त्रास असलेले लोक त्यांच्या आहारात मनुका समाविष्ट करू शकतात. मात्र, मनुक्याचे सेवन कमी प्रमाणात असावे. मनुक्यामध्ये सर्व फळांप्रमाणेच नैसर्गिक साखर आणि कर्बोदके असतात. त्यामुळे त्याचा संतुलित आहार म्हणून समावेश करता येईल. त्यांच्या नैसर्गिक साखरेव्यतिरिक्त, मनुका हे फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचाही चांगला स्रोत आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर मनुका तुम्ही खाऊ शकता. परंतु चांगले ग्लायसेमिक व्यवस्थापन राखण्यासाठी कार्बोहायड्रेटचे सेवन पाहणे महत्वाचे आहे.
मनुक्याचे फायदे
पोषक तत्वांनी समृद्ध : मनुका हे जीवनसत्त्व आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. त्यात लोह देखील असते, जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आवश्यक असते. मनुक्यात कॅल्शियम, पोटॅशियम सारखे इतर आवश्यक पोषक घटक देखील असतात.
पचनासाठी चांगले : मनुक्यामध्ये विरघळणारे फायबर असते, जे पोट स्वच्छ ठेवण्यास आणि पचनसंस्था योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. विरघळणारे फायबर कार्बोहायड्रेट्सचे पचन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त : मनुक्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. हे वाढलेले वजन कमी करण्यात प्रभावी ठरते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जे लोक उच्च फायबरयुक्त आहार घेतात त्यांच्या शरीराचे वजन कमी असते.
हृदय निरोगी ठेवते : मनुक्यात अँटिऑक्सिडेंट आणि इतर वनस्पती संयुगे असतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. काही संशोधनात असे सुचवले आहे की मनुका खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित होतो आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
हाडांसाठी फायदेशीर : मनुका बोरॉनचा चांगला स्रोत आहे. हे असे खनिज आहे, जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. बोरॉन हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :