(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Midnight Craving : मध्यरात्रीनंतर तुम्हीही किचनमध्ये जाता का? Night Craving नेमकी कशामुळे होते जाणून घ्या
Reason Of Midnight Craving : नाईट क्रेविंग झाल्यास काहीतरी गोड खावेसे वाटते. मात्र, असे वेळी अवेळी खाणे हे शरीरातील पचनसंस्थेसाठी हानिकारक ठरते.
Reason Of Midnight Craving : जर तुम्ही रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असाल, तर रात्री काम करताना भूक लागणे ही तुमच्या शरीराची आणि मेंदूची गरज आहे. पण जर तुम्ही वेळेवर झोपायला गेलात आणि मध्यरात्री भूक लागल्याने उठलात तर तुमची किचन फेरी तर होतेच. साहजिकच असे रात्री जेवायला कोणालाच आवडत नाही. मात्र, जर काही खाल्ले नाही तर शांत झोपही लागत नाही. असे बऱ्याच जणांच्या बाबतीत घडते. यालाच 'नाईट क्रेविंग' (Midnight Craving) म्हणतात.
नाईट क्रेविंग झाल्यास काहीतरी गोड खावेसे वाटते. म्हणजेच आईस्क्रिम किंवा कॅडबरी, मिठाई खावीशी वाटते. हे पदार्थ खाल्ल्याने जीभेवर चवही रेंगाळते आणि भूकही लगेच नियंत्रित राहते. मात्र, असे वेळी अवेळी खाणे हे शरीरातील पचनसंस्थेसाठी हानिकारक ठरते. रात्री झोपेतून उठल्यानंतर असे पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर अतिरिक्त परिणाम होतो आणि खाल्लेल्या या गोष्टी नीट पचतही नाहीत. यामुळे छातीत दुखणे, पोटात मळमळणे, जळजळ होणे यांसारख्या समस्या सुरु होतात.
झोपताना भूक का लागते?
दिवसा भूक लागणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण मानले जाते. मात्र, रात्रीच्या वेळी काहीतरी खावेसे वाटणे, भूक लागणे हे वाढत्या समस्यांचे एक लक्षण आहे.
काय आहेत लक्षणं?
- रक्तातील साखरेची पातळी असंतुलित असताना, रात्री झोपताना अनेकदा भूक लागण्याची समस्या उद्भवते. ज्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त आणि खूप लवकर कमी होते, त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यांच्या सल्ल्याने औषधे घेण्याबरोबरच तुमचा आहारही बदलायला हवा.
- जे लोक जेवण वेळेवर करत नाहीत किंवा ज्यांना जेवणाची ठराविक वेळ नसते, त्यांना रात्री भूक लागण्याची समस्या भेडसावत असते.
- जे लोक जेवण व्यवस्थित जेवतात आणि वेळेवर खातात पण तरीही त्यांना रात्री भूक लागली असेल तर याचा अर्थ असा होतो की, तुमच्या जेवणात पोषक तत्वांची कमतरता आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जेवणात आरोग्यदायी पोषक घटकांचा समावेश करावा.
- योग्य जीवनशैलीनंतरही, काही लोकांना रात्री भूक लागण्याची समस्या असते. कारण ते खूप शरीरातील हार्मोनल बदलांचा सामना करतात. हे शक्यत: मुलांबरोबर तारुण्यात आणि स्त्रियांबरोबर गर्भधारणेदरम्यान होते.
- काही लोकांना मानसिक त्रासामुळे नाईट क्रेविंग होण्याची देखील समस्या असते. ज्यांना नाईट इटिंग सिंड्रोमचा त्रास होतो त्यांना देखील ही समस्या असते. अशा लोकांनी वेळीच डॉक्टरांशी किंवा मानसोपचारतज्ज्ञाशी संवाद साधावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :