Health Tips : हिवाळ्यात 'या' आजाराचा सर्वात जास्त धोका! प्रतिबंधाची पद्धत नेमकी कोणती? जाणून घ्या
Blood Pressure Diet : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे बहुतेक लोक आता लठ्ठपणाशिवाय उच्च रक्तदाबाचे बळी ठरत आहेत.
Blood Pressure Diet : मधुमेहाप्रमाणेच आता उच्च रक्तदाबाची (Blood Pressure) समस्याही सामान्य झाली आहे. याचं कारण म्हणजे आपली बिघडलेली जीवनशैली (Lifestyle). केवळ वृद्धच नाही तर तरुणांनाही हाय बीपीच्या (High BP) समस्येने ग्रासले आहे. असं असलं तरी थंडीच्या दिवसांत आरोग्याबाबत थोडं दक्ष राहण्याची गरज आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, थंडीच्या वातावरणात रक्तदाब वाढणे म्हणजे उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. या ऋतूमध्ये रक्तवाहिन्या आणि हृदयावर जास्त दाब पडल्याने रक्तदाब वाढतो. याशिवाय आहारातील बदल आणि हिवाळ्यात शारीरिक हालचाली कमी होणे हे देखील याचे कारण आहे. पण उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काही सुपरफूड्स वापरू शकता. बीपी नियंत्रित करणारे पदार्थ जाणून घेऊयात.
तुमचा बीपी नियंत्रित करणारे पदार्थ खालीलप्रमाणे :
अश्वगंधा फायदेशीर (Ashwagandha)
अश्वगंधा अनेक रोगांवर रामबाण उपाय मानली जाते. रक्तदाबाच्या समस्येवरही हे खूप फायदेशीर आहे. ज्या लोकांना वजन वाढणे किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास होतो त्यांनी आपल्या आहारात अश्वगंधाचा अवश्य समावेश करावा. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा अश्वगंधा पावडर एक ग्लास पाण्याबरोबर घ्या.
लसूण आरोग्यासाठी गुणकारी (Garlic)
लसणाचा वापर अनेक घरगुती उपचारांमध्येही केला जातो. ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी दररोज एक लसणाच्या पाकळीचं सेवन करावं. यामुळे बीपीची समस्या दूर होते.
पिस्त्याचं सेवन करा (Pistachio)
पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट यांसारखे अनेक घटक पिस्त्यात आढळतात. पिस्ता रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या रूग्णांनी पिस्त्याचं सेवन करणं खूप फायदेशीर ठरू शकते.
मेथीचे दाणे (Fenugreek)
मेथीचे दाणे घरांमध्ये नेहमी वापरले जातात. मेथी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. विशेषतः हिवाळ्यात मेथीचं सेवन केल्याने शरीर उबदार राहते. मेथीमध्ये विद्राव्य फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. याशिवाय शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलही कमी करण्यास उपयुक्त ठरतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :