(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : 76 टक्के भारतीयांमध्ये 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; 'हे' आजार होण्याची शक्यता, सर्व्हेक्षणातून स्पष्ट
Vitamin D Deficiency : सर्व्हेक्षणातून असे दिसून आले आहे की 25 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा सर्वाधिक फटका बसतो.
Vitamin D Deficiency : निरोगी राहण्यासाठी, आपल्या शरीरातील सर्व आवश्यक पोषक तत्वांचे प्रमाण पूर्ण राहणं सर्वात महत्वाचं आहे. कारण त्यांच्या कमतरतेमुळे अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे लोकांना गंभीर आजारांनाही सामोरे जावे लागते. नुकत्याच एका सर्व्हेक्षणातून असं सोमर आलं आहे की, भारतातील 76 टक्के लोकसंख्येमध्ये व्हिटॅमिन डीची (Vitamin D) कमतरता आढळून आली आहे.
हा डेटा भारतातील सुमारे 27 शहरांमध्ये राहणाऱ्या 2.2 लाखांहून अधिक लोकांच्या चाचणीवर आधारित आहे. सर्व्हेक्षणात असे दिसून आले आहे की 25 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना या स्थितीचा सर्वाधिक त्रास होतो. चाचणीमध्ये 79 टक्के पुरुष आणि 75 टक्के महिलांचा समावेश होता. सुरतमधील 88 टक्के आणि वडोदरातील 89 टक्के लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत. याशिवाय दिल्ली-एनसीआरमधील 72 टक्के लोकांमध्ये या व्हिटॅमिनची कमतरता आढळून आली. या जीवनसत्त्वाची कमतरता तरुणांमध्ये सर्वाधिक दिसून आली. 25 वर्षांपर्यंतच्या 84 टक्के तरुणांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळून आली. 25-40 वयोगटातील 81 टक्के लोकांमध्ये अशी परिस्थिती दिसून आली.
व्हिटॅमिन डीची वैशिष्ट्ये काय आहेत?
व्हिटॅमिन डी ला सनशाईन व्हिटॅमिन असेही म्हटले जाते. मजबूत प्रतिकारशक्ती, हाडांची ताकद, मानसिक आरोग्य, स्नायू आणि चयापचय यासाठी हे जीवनसत्व खूप महत्वाचे आहे. जेव्हा एखाद्याला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन डी शरीराला मिळत नाही, तेव्हा त्याची कमतरता कालांतराने वाढत जाते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होतात.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारे परिणाम :
1. मधुमेह
2. नैराश्य
3. संधिवात
4. प्रोस्टेट कर्करोग
व्हिटॅमिन डीची कमतरता कशी दूर करावी?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जाऊ शकतात.
1. व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ खा, जसे की फॅटी फिश, मशरूम, डेअरी, अंडी, लाल मांस यांचा आहारात समावेश करा.
2. सूर्यप्रकाश घेतल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता देखील दूर होते. दिवसातून दोनदा 30 मिनिटे चेहरा, पाठ आणि पायांवर सूर्यप्रकाश घ्या.
3. व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :