Health Tips : महिलांमध्ये या 3 पोषक तत्त्वांची कमतरता सर्वात जास्त; वेळीच ओळखा 'ही' लक्षणं
Health Tips : बहुतेक स्त्रिया त्यांच्या दैनंदिन जीवनाची योजना त्यांच्या कुटुंबाच्या गरजांनुसार करतात.
Health Tips : महिला अनेकदा आपल्या कुटुंबाची जास्त काळजी घेतात आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतात. बहुतेकदा, स्त्रिया आपले आरोग्य किंवा जीवनशैलीकडे दुर्लक्ष करतात. पण तसं पाहायला गेलं तर महिलांच्या आरोग्यासाठी हे नुकसानकारक आहे. ठराविक वयानंतर तुमच्या शरीराला सर्व पोषकतत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळत नसतील तर एकामागून एक नवीन आजारांना आमंत्रण मिळू लागते. कधी हाडे कमकुवत असतात, कधी मासिक पाळी अनियमित असते, कधी हार्मोनल असंतुलन असते, तर कधी सिस्टची तक्रार असते. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशा तीन पोषक तत्त्वांची नावं सांगणार आहोत ज्या स्त्रियांमध्ये कमी असतात.
कोणत्या 3 मुख्य पोषक तत्वांची कमतरता आता स्त्रियांमध्ये सामान्य झाली आहे?
1. लोहाची कमतरता
स्त्रियांमध्ये लोहाच्या कमतरतेची अनेक कारणे असू शकतात :
- गर्भधारणेदरम्यान लोहाची वाढलेली गरज.
- मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे लोहाची कमतरता.
- लोहयुक्त अन्नाचा अभाव.
महिलांनी आपल्या आहारात लाल मांस, मसूर, राजमा, बीन्स, पालक आणि भोपळ्याच्या बियांचा समावेश करावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त तपासणी करा आणि कमतरता असल्यास मल्टीविटामिन गोळ्या किंवा लोह सप्लिमेंट घ्या.
2. कॅल्शियमची कमतरता
महिलांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेची कारणे :
- लैक्टोज असहिष्णु असल्यामुळे महिला दूध पिऊ शकत नाहीत.
- लघवीचे प्रमाण वाढवणारी काही औषधे घेणे ज्यामुळे शरीरातून मूत्रमार्गे जास्तीचे कॅल्शियम बाहेर टाकले जाते.
- आहारात कॅल्शियमची कमतरता.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे महिलांना ऑस्टियोपोरोसिस आणि फ्रॅक्चरसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच, दात आणि हाडे दोन्ही कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी दूध, दही, चीज, पालक, ब्रोकोली, एवोकॅडो, लेडीफिंगर इत्यादींचा आहारात समावेश करावा. वयाच्या 30 नंतर तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त तपासणी करा आणि कमतरता असल्यास मल्टीविटामिन गोळ्या किंवा लोह सप्लिमेंट घ्या.
3. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता
महिलांमध्ये व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची कारणे :
मुख्य कारण म्हणजे आहार. ज्या स्त्रिया मांस, अंडी खात नाहीत आणि दूध पीत नाहीत त्यांना व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असते. त्याच्या कमतरतेमुळे हात-पाय दुखू शकतात, थकवा, भूक न लागणे, चालण्यास त्रास होणे, त्वचा आणि डोळे पिवळसर होणे, डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :