एक्स्प्लोर

Health : पॉपकॉर्न सर्वांचं फेवरेट! पण आरोग्यासाठी किती फायदेशीर? किती नुकसानकारक? फायदे, तोटे जाणून घ्या

Health : पॉपकॉर्नचे सेवन आरोग्यासाठी कितपत फायदेशीर आहे? या लेखात आम्ही आमच्या तुमच्यासाठी या प्रश्नाचे उत्तर आणले आहे.

Health :   पॉपकॉर्न म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते, चित्रपटगृहात सिनेमा पाहताना पॉपकॉर्न नसेल तर मजा येत नाही असं खवय्ये सांगतात. चित्रपटगृह, जत्रा किंवा रस्त्यावर पॉपकॉर्नचा (Popcorn) वास तुम्हाला ते खायला भाग पाडतो. कदाचित याच कारणामुळे पॉपकॉर्न हा जगात सर्वाधिक खाल्लेला खाद्यपदार्थ मानला जातो. पण पॉपकॉर्नची लोकप्रियता पाहून अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की, पॉपकॉर्नचे सेवन आरोग्यासाठी कितपत फायदेशीर आहे? या लेखात आम्ही आमच्या तुम्हाला प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. न्यूट्रिशनिस्ट गुंजन सचदेवा यांनी याबाबत काय सांगितलय? माहिती जाणून घ्या

 पॉपकॉर्न हा एक उत्तम नाश्ताही...

पॉपकॉर्नच्या पौष्टिकतेबद्दल बोलताना, कॉर्न म्हणजे मका.. या कॉर्न मध्ये खूप शक्ती असते. यामुळेच पॉपकॉर्नमध्ये उच्च फायबरसोबतच, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात आढळतात. अशा परिस्थितीत शरीराला आवश्यक पोषण देण्यासोबतच विविध शारीरिक समस्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यातही मदत होते. त्यामुळे पॉपकॉर्न हा एक उत्तम नाश्ताही आहे. जो मूड तसेच आरोग्य सुधारतो. आता याच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वजन कमी करण्यास उपयुक्त

पॉपकॉर्नमध्ये कमी कॅलरी आणि उच्च फायबर मूल्य वजन कमी करण्यासाठी विशेषतः उपयुक्त ठरते. पॉपकॉर्नच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते आणि वजन नियंत्रित करणे सोपे होते.

पचनक्रिया व्यवस्थित ठेवते

पॉपकॉर्नमध्ये असलेले फायबर अन्न पचण्यास थेट मदत करते. अशा परिस्थितीत जर पॉपकॉर्नचे सेवन कमी प्रमाणात केले तर ते तुमची पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त ठरू शकते.

शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त

शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांसोबतच अँटिऑक्सिडंट्सही पॉपकॉर्नमध्ये चांगल्या प्रमाणात आढळतात. हे सर्व पोषक घटक आजारांपासून बचाव करून शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.

मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर

पॉपकॉर्नमध्ये असलेले उच्च फायबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तीच्या समस्या कमी होतात.

कर्करोगाचा धोका कमी होतो

पॉलीफेनॉलिक हे पॉपकॉर्नमध्ये आढळते, जे कर्करोगाचा धोका कमी करणारे शक्तिशाली संयुग म्हणून ओळखले जाते. पॉपकॉर्नचे सेवन काही प्रमाणात करायचे असले तरी, यामुळे कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाऊ शकते.

साधे पॉपकॉर्नच खा..!

आता पॉपकॉर्न खाल्ल्याने होणाऱ्या संभाव्य हानीबद्दल बोलूया, आजकाल बाजारात उपलब्ध असलेले फ्लेवरचे पॉपकॉर्न आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. पॉपकॉर्नला मसालेदार आणि चवदार बनवण्यासाठी त्यात ज्या प्रकारचे मीठ, मसाले आणि लोणी वापरतात. त्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य तर कमी होतेच, शिवाय ते आरोग्यासाठी हानिकारकही होते. यामुळेच पॉपकॉर्न खाल्ल्याने वजन वाढण्याची समस्या लोकांना भेडसावू शकते. तर साधा पॉपकॉर्न वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. त्यामुळे जर तुम्हाला पॉपकॉर्न खाण्याचे फायदे घ्यायचे असतील तर तुम्ही साधे पॉपकॉर्नच खाणे योग्य ठरेल. चवीसाठी तुम्ही साधे पॉपकॉर्न त्यावर हलके मीठ टाकून खाऊ शकता, पण आरोग्यासाठी जास्त मीठ, मसाले आणि रसायने असलेले पदार्थ वापरून बनवलेल्या पॉपकॉर्नपासून दूर राहणे चांगले. यासोबतच मायक्रोवेव्हमध्ये बनवलेल्या पॉपकॉर्नचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कॉर्नचे दाणे सामान्य गॅसच्या शेगडीवर भाजून पॉपकॉर्न तयार केल्यास ते चांगले होईल. अशाप्रकारे काही खबरदारी घेतल्यास पॉपकॉर्नचे मजेदार आणि आरोग्यदायी फायदे दोन्ही एकाच वेळी मिळू शकतात.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Saree Cancer : 'काय सांगता! साडी नेसल्यानेही कॅन्सर होऊ शकतो?' नेमका कोणता कर्करोग आहे? हा आजार भारतात कसा पसरतोय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uddhav Thackeray : भारत De-Modi-Nation होणार,  उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी ABP MajhaGhatkopar Bhavesh Bhinde Arrested : घाटकोपर बॅनर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटकPalghar Rain Destruction: छप्पर उडालं,लेकरं उघड्यावर पडली.. अवकाळी पावसात संसार वाहून गेलाYavatmal Doctor Beats Woman : डोळ्यासमोर लेकचा तफडून मृत्यू, डाक्टराने आईच्या खानाखाली मारली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
ठाकरे सरकारच्या आशीर्वादाने झालेले खून, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
फुकट्या रेल्वे प्रवाशाचा टीसीसह कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, कंत्राटी कर्मचाऱ्याने जीव गमावला, दोघे जखमी
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
MPSC च्या लिपिक टंकलेखक पदांसाठीची अंतिम प्रतीक्षा यादी जाहीर, 155 उमेदवारांची नावे जाहीर
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
ICC Ranking : सूर्यादादाचा दबदबा कायम, अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्याचा जलवा, गोलंदाजीत अक्षर आघाडीवर 
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं
सामना पावसामुळे रद्द, हैदराबादचा प्लेऑफमध्ये प्रवेश, दिल्ली-लखनौचं आव्हान संपलं
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 17 मे ते 2 जूनदरम्यान विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! 17 मे ते 2 जूनदरम्यान विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द
CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
CSK vs RCB : आरसीबीसाठी करो या मरो, चेन्नईबरोबर फायनलसाराखा सामना
माता न तूं वैरिणी! आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ
आईच्या संमतीने नराधमाकडून सातवीतील मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार, वडिलांचीही साथ; न्यायालयाकडून मिळाला न्याय
Embed widget