Health Care Tips : गरम दूध आरोग्यासाठी फायदेशीर; आजार राहतात दूर
गरम दूध प्यायल्याने हाडे मजबूत होऊन शरीरात ऊर्जा निर्माण होते. जाणून घेऊयात गरम दूध पिण्याचे फायदे

Health Benefits Of Drinking Hot Milk: दूधामध्ये प्रोटीन, कॅलरी, कॅल्शियम आणि व्हिटामिन डी, बी-2 ही पोषक तत्वे असतात. थंड दूध पिण्याऐवजी जर गरम दूध पिले तर ते आरोग्यासाठी पायदेशिर ठरते. गरम दूध प्यायल्याने हाडे मजबूत होऊन शरीरात ऊर्जा निर्माण होते. जाणून घेऊयात गरम दूध पिण्याचे फायदे
ब्लड शूगर लेव्हल राहते नियंत्रणात-
रात्री झोपण्याआधी गरम दूध प्यावे, त्यामुळे ब्लड शूगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहत. मधुमेह असणाऱ्यांनी रोज झोपण्याआधी एक ग्लास गरम दूध प्यावे.
वजन कमी होते
एक ग्लास गरम दूध प्यायल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होते.
हाडे मजबूत होतात-
हिवाळ्यात अनेकांना सांधे दुखीचा त्रास होतो. जर रोज रात्री झोपण्याआधी गरम दूध पिले तर हाडे मजबूत होतात. तसेच सांधेदुखी देखील होत नाही.
दररोज दूधात तूप टाकून प्या, पळून जातील आजार
थंडीमध्ये गरम दूधात तूप टाकून प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.आर्युवेदानुसार, शरीराला निरोगी ठेवण्यासाठी दररोज तूप टाकलेले गरम दूध प्यावे. गरम दूधामध्ये तूप टाकून तुम्ही पिले तर शरीरात एंजाइम्स रिलीज होतात. हे एंजाइम्स तुमची पचन शक्ती वाढवतात. त्यामुळे जर तुम्हाला अपचन होत असेल तर तुम्ही रोज एक ग्लास तूप टाकलेले दूध पिले पाहिजे.
टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
संबंधित बातम्या-
Winter Health Care: थंडीत 'या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करणं ठरेल फायदेशीर; जाणून घ्या फायदे
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























