एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पावसाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी
मुंबईः मोठ्या प्रतिक्षेनंतर वरुणराजा महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मात्र पावसाचा आनंद घेताना आरोग्याची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. वातावरणातील दमटपणा, थोडाफार गारवा आणि अंगावर ओले कपडे जास्त वेळ राहून देणे यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं.
पावसाळ्यात विविध डासांचा प्रसार होतो. त्यामुळे पावसाळ्यात दवाखाने नेहमी हाऊसफुल्ल झाल्याचं आपण पाहतो. पावसाळ्यातील आजार टाळण्यासाठी स्वच्छता आणि त्यासोबत विविध बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे.
पावसाळ्यातील आजार
- हिवताप, मलेरियाः पावसाळ्यात प्रामुख्याने डास चावल्यामुळे हिवताप किंवा मलेरिया होतो. एनॉफिलीस जातीच्या मच्छराने दंश केल्यास हिवतापाची लागण लगेच होते.
- सर्दी, खोकलाः अंगावर ओले कपडे जास्त वेळ, पावसात भिजणे यांमुळे सर्दी खोकल्यासारखे किरकोळ आजार उद्भवतात.
- दमाः ढगाळ वातावरणामुळे पावसाळ्यात दमा असणाऱ्या रुग्णांना त्रास जास्त जाणवतो. दमट, गार हवा आणि मंद पचनशक्ती यामुळे दम्याचा त्रास वाढतो.
- जुलाबः पावसाळ्यात पाण्याची प्रदुषण जास्त होते. त्यामुळे जुलबा आजार उद्भवण्याची शक्यता असते.
- पायाला चिखल्या होणेः पावसात जास्त वेळ भिजल्यास किंवा ओली चप्पल पायात जास्त वेळ ठेवल्यास चिखल्या होतात.
- पावसात भिजल्यास तत्काळ कपडे बदलणं गरजेचं आहे.
- डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करणे. घरात किंवा परिसरात स्वच्छता ठेवणे. तसेच डास प्रतिबंधक औषधे, जाळ्या यांचा वापर करणे.
- स्वच्छ किंवा उष्ण पाणी पिणे
- पावसात भिजणे टाळावे
- आजाराची लक्षणं दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement