![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Happy Friendship Day 2023 : तुम्हालाही 'फ्रेंडशिप डे' स्पेशल बनवायचा असेल तर 'या' खास पद्धतींनी आजचा दिवस साजरा करा
Happy Friendship Day 2023 : फ्रेंडशिप डे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभरात साजरा केला जातो.
![Happy Friendship Day 2023 : तुम्हालाही 'फ्रेंडशिप डे' स्पेशल बनवायचा असेल तर 'या' खास पद्धतींनी आजचा दिवस साजरा करा Happy Friendship Day 2023 follow these special methods to celebrate this day marathi news Happy Friendship Day 2023 : तुम्हालाही 'फ्रेंडशिप डे' स्पेशल बनवायचा असेल तर 'या' खास पद्धतींनी आजचा दिवस साजरा करा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/30/d0a3887e9b0dc57f77c5076a06495bf11659167040_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Happy Friendship Day 2023 : मैत्रीचं नातं रक्ताचं नातं नसतं, पण हे नातं रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नसतं. काही लोकांसाठी, मैत्रीचं नातं हे इतर कोणत्याही नात्यापेक्षा मोठं असतं. आजचा दिवस आपल्या प्रिय मित्र-मैत्रीणींसाठी खूप खास आहे. कारण आज 'फ्रेंडशिप डे' (Happy Friendship Day 2023) आहे. तुम्हालाही आजचा दिवस काहीशा हटके पद्धतीने साजरा करायचा असेल तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काही बेस्ट ऑप्शन्स घेऊन आलो आहोत. चला तर जाणून घेऊयात.
फ्रेंडशिप डे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभरात साजरा केला जातो. या वेळी भारतात फ्रेंडशिप डे 6 ऑगस्ट 2023 रोजी म्हणजेच आजच्या दिवशी साजरा केला जातोय. आजच्या दिवशी लोक आपल्या भावना आपल्या मित्रांसमोर शेअर करतात. सर्वच वयोगटातील लोकांना, खासकरुन युवकांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारची जास्त आतुरता असते. कारण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी 'फ्रेंडशिप डे' साजरा करण्यात येतो. या दिवशी अनेकजण एकमेकांना फ्रेंडशिप बॅन्ड बांधतात आणि आपली मैत्री अधिक घट्ट करतात.
जर तुम्हालाही तुमच्या मित्रांबरोबर फ्रेंडशिप डे स्पेशल बनवायचा असेल, पण हा दिवस कसा साजरा करायचा याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही आयडिया घेऊन आलो आहोत. यामुळे तुमचा दिवस खूप चांगला जाईल आणि तुम्ही या दिनसाचा मनसोक्त आनंद लुटू शकाल.
फ्रेंडशिप डे 2023 सेलिब्रेशन टिप्स :
1. चित्रपट पाहण्यासाठी प्लॅन तयार करा
फ्रेंडशिप डेच्या खास प्रसंगी, तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर एखादा चांगला चित्रपट पाहण्याचा प्लॅन करू शकता. तुम्ही मैत्रीशी संबंधित कोणताही चित्रपट पाहू शकता. या निमित्ताने तुमचं गेट टू गेदरही होईल आणि तुमचा दिवसही छान आनंदात जाईल.
2. मित्रांबरोबर फिरायला जा
तुम्ही आजच्या दिवशी तुमच्या मित्र-मैत्रीणींबरोबर एखाद्या छानशा ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. जवळपासच्या कोणत्याही हिल स्टेशनला भेट देऊन तुम्ही या दिवसाचा आनंद घेऊ शकता.
3. आजच्या दिवशी कॉल करून मित्रांना शुभेच्छा द्या
जर तुम्ही ऑफिसमध्ये व्यस्त असाल आणि तुमच्या मित्रांशी जास्त बोलू शकत नसाल तर वेळ काढून तुमच्या मित्र-मैत्रिणींना आठवणीने फोन करा आणि ते तुमच्यासाठी किती खास आहेत हे त्यांना सांगा.
4. जुन्या आठवणींना उजाळा द्या
जर तुम्हाला कुठे बाहेर जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी बसूनसुद्धा तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन आजचा दिवस खास बनवू शकता.
5. भेटवस्तू द्या
खरंतर, गिफ्ट्स कोणाला नाही आवडत. तुम्हाला सुद्धा आजचा दिवस मित्रांसाठी स्पेशल बनवायचा असेल तर तुमच्या बेस्ट फ्रेंडला आज छानसं गिफ्ट द्या. आणि तुम्ही त्यांच्यासाठी किती मौल्यवान आहात याची जाणीव करून द्या.
महत्त्वाच्या बातम्या :
Friendship Day : तेरे जैसा यार कहाँ! ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच का साजरा केला जातो 'फ्रेंडशिप डे'?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)