एक्स्प्लोर
Weak Nerves : हिवाळ्यात नसा कमकुवत होतायत? रोजच्या आहारात घ्या 'ही' फळं!
Weak Nerves : हिवाळ्यात नसांमध्ये येणारी कमजोरी दूर करण्यासाठी डाळिंब, बीट, ड्रायफ्रूटस, फॅटी फिश आणि ग्रीन टीचा आहारात समावेश करा.
Weak Nerves :
1/12

हिवाळ्यात अनेकदा आपली हाडं, नसा कमकुवत होतात. अशा वेळी शरीरात थंडपणा जाणवतो आणि हातपाय गळून निघाल्यासारखे वाटतात.
2/12

कधी कधी एखादी वस्तू हाताने उचलताना हातात शक्तीच नाही असं वाटतं. यामागचं मुख्य कारण म्हणजे शरीरातील काही पोषक तत्वांची कमतरता.
3/12

व्हिटॅमिन B12 आणि लोहाची कमतरता असल्यास नसांवर परिणाम होऊ शकतो. आपल्या शरीरात अंदाजे 16 हजार किलोमीटर लांबीच्या नसांचा जाळा असतो.
4/12

या नसांद्वारे मेंदूपासून शरीराच्या प्रत्येक भागाला सिग्नल पाठवले जातात. जेव्हा या नसांमध्ये कमजोरी येते, तेव्हा शरीराला सिग्नल नीट पोहोचत नाहीत.
5/12

यामुळे शरीराच्या काही भागांमध्ये ताकद आणि हालचाल कमी होऊ शकते. नसांना पुन्हा बळकटी देण्यासाठी योग्य आहार घेणं खूप गरजेचं आहे.
6/12

डाळिंब हे कमकुवत नसांमध्ये नवीन ऊर्जा आणण्यासाठी उपयुक्त फळ आहे. डाळिंबात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि सूज कमी करणारे घटक नसांना मजबूत करण्यास मदत करतात.
7/12

बीट हे हिवाळ्यातील खूप फायदेशीर फळ आहे. कारण बीट मेंदू आणि नसांमध्ये रक्तप्रवाह वाढवण्यास आणि त्यांना पोषण देण्यास मदत करतं.
8/12

ड्रायफ्रूटस आणि बियांमध्ये आवश्यक व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात आढळतात. या पदार्थांमधील असलेले व्हिटॅमिन E आणि B12 नसांना पुन्हा कार्यक्षम बनवतात.
9/12

फॅटी फिश म्हणजेच तेलकट मासे जसे सॅल्मन, टूना आणि सार्डिन हे नसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
10/12

या माशांमध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी ऍसिड नसांचे संरक्षण करण्यास मदत करतात.
11/12

ग्रीन टी पिणेही हिवाळ्यात फायदेशीर ठरतं, कारण त्यात असलेले फ्लेव्होनॉईड्स नसांना नवीन ऊर्जा देतात आणि त्यांची ताकद वाढवण्यास मदत करतात.
12/12

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 08 Nov 2025 04:39 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
























