एक्स्प्लोर
Chocolates Or Biscuits : चॉकलेट की बिस्कीट? आरोग्यासाठी काय जास्त घातक?
Chocolates Or Biscuits : चॉकलेटपेक्षा बिस्किट आरोग्यासाठी अधिक घातक असतं. थोड्या प्रमाणात डार्क चॉकलेटचं सेवन फायदेशीर ठरू शकतं.
Chocolates Or Biscuits
1/11

आजच्या काळात चॉकलेट आणि बिस्किट हे दोन्ही पदार्थ जवळजवळ सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग झाले आहेत.
2/11

पूर्वी लोक घरचे पदार्थ खायचे, पण आता बाजारात मिळणाऱ्या तयार वस्तू जास्त खाल्ल्या जातात.
3/11

या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अनेक लोकांना वाटतं की चॉकलेटमुळे वजन वाढतं आणि साखरेचं प्रमाण जास्त होतं.
4/11

काही लोक म्हणतात की बिस्किट हे चॉकलेटपेक्षा जास्त नुकसानदायक असतं. खरं तर चॉकलेट पूर्णपणे वाईट नाही, ते कोणत्या प्रकारचं आहे यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो.
5/11

डार्क चॉकलेटमध्ये काही घटक हृदयासाठी चांगले असतात. थोड्या प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्याने रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
6/11

मिल्क आणि व्हाईट चॉकलेटमध्ये कोको कमी आणि साखर जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे अशी चॉकलेट्स शरीरासाठी वाईट ठरतात.
7/11

जास्त साखर आणि फॅट असलेली चॉकलेट खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. मधुमेह आणि दातांच्या समस्या होतात.
8/11

बिस्किटही दिसायला साधं असलं तरी त्यात रिफाइन्ड मैदा आणि ट्रान्स फॅट असतात. त्यामुळे त्यात पोषक घटक नसतात, फक्त रिकाम्या कॅलरीज मिळतात.
9/11

बिस्किटांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते. वारंवार बिस्किट खाल्ल्याने वजन वाढतं आणि शरीरात हार्मोनल बदल होऊ शकतात.
10/11

जर तुलना केली तर बिस्किट हे चॉकलेटपेक्षा जास्त नुकसानदायक ठरतात. त्यामुळे शक्य असल्यास बिस्किटांचं सेवन कमी करा आणि थोड्या प्रमाणात डार्क चॉकलेट ख. ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं ठरू शकतं.
11/11

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 08 Nov 2025 05:44 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















