एक्स्प्लोर
Advertisement
Hair Care Tips : तुमच्या केसांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा; घनदाट केसांसाठी फायदेशीर उपाय
Hair Care Tips : कडक उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे केसांचा नैसर्गिक रंग निघून जातो आणि केस गळतात.
Hair Care Tips : ज्याप्रमाणे कडक उन्हामुळे आपल्या चेहऱ्यावरील ओलावा शोषून घेतला जातो. त्याचप्रमाणे सूर्याची अतिनील किरणे आपल्या केसांमधील (Hair Care Tips) आर्द्रता शोषून घेतात. यामुळे आपले केस खूप कोरडे आणि निर्जीव होतात.
कडक उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे केसांचा नैसर्गिक रंग निघून जातो आणि केस गळतात. यामुळे उन्हाळ्यात केसांच्या समस्या आणखी वाढतात. उन्हाळ्यात केवळ कडक सूर्यप्रकाशामुळे केस खराब होतात असे नाही तर घामामुळे टाळूमध्ये बुरशीजन्य संसर्ग होऊ लागतो ज्यामुळे केस आणखी खराब होतात. चला जाणून घेऊयात, केसांची काळजी कशी घ्यावी.
'अशा' प्रकारे केसांचं नुकसान होण्यापासून वाचवा
- दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या, जे तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करेल आणि तुमच्या केसांना ओलावा मिळत राहील.
- तुमच्या नाश्त्यामध्ये हंगामी फळांचे सेवन करा, यामुळे केसांना आवश्यक पोषक तत्त्वे मिळतील.
- हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर आढळते, जे केसांसाठी फायदेशीर आहे. हे आपल्या केसांना तीव्र सूर्यप्रकाशाच्या प्रभावापासून वाचवण्यास मदत करेल.
- तुमच्या केसांना मसाज केल्याची खात्री करा, हे तुमच्या केसांना बारीक धूळ चिकटण्यापासून रोखू शकते. त्यामुळे तुमच्या केसांत कमी गुंता होईल आणि सूर्याच्या अतिनील किरणांचाही त्यांच्यावर कमी परिणाम होईल.
- तुमचे केस बांधून ठेवा. यामुळे तुम्हाला घामामुळे इन्फेक्शन होणार नाही आणि तुमचे केसही अडकणार नाहीत.
- उन्हात जेव्हाही बाहेर जाल तेव्हा स्कार्फने केस झाकून ठेवा. शक्य असल्यास उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्री वापरा.
- ओले केस ड्रायरने सुकवणे टाळा. कारण कडक उन्हात वातावरण आधीच खूप गरम असते. त्यामुळे त्यातून बाहेर पडणारी गरम हवा तुमच्या केसांमधील ओलावा शोषून घेते. त्यामुळे तुमचे केस निर्जीव आणि कोरडे होतात.
- केस धुतल्यानंतर कंडिशनर लावायला विसरू नका.
- उन्हाळ्यात केसांना दही आणि कोरफड जेलचा हेअर मास्क लावत राहा. हे तुमच्या केसांध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करेल.
- आपले केस वेळोवेळी ट्रिम होतील याची खात्री करा. यामुळे केसांची लवकर वाढ होण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement