एक्स्प्लोर
Benefits Of Dragon Fruit : ड्रॅगन फ्रुट खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे
Benefits Of Dragon Fruit : ड्रॅगन फ्रूट हे आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी खूप फायदेशीर फळ आहे. हे फळ शरीराला ताजेतवाने ठेवून अनेक आजारांपासून संरक्षण करतं. जाणून घ्या फायदे.
Benefits Of Dragon Fruit
1/11

ड्रॅगन फ्रूट हे फळ पौष्टिक आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात असलेले अँटिऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन C आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात आढळतात.
2/11

ड्रॅगन फ्रूट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मोठी मदत करतं. हे फळ नियमित खाल्ल्यास सर्दी, ताप, आणि संसर्गजन्य आजारांपासून शरीराचं नैसर्गिक रक्षण होतं.
3/11

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी हे फळ खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.
4/11

यामुळे नैसर्गिक फायबर पचनक्रिया सुधारतं आणि पोटाशी संबंधित तक्रारी कमी करतं. ड्रॅगन फ्रूट शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतं.
5/11

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी दर आठवड्यात हे फळ खाणे लाभदायक ठरते.
6/11

या फळातील नैसर्गिक फायबर पचन सुधारण्यास मदत करतं. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास हे उपयोगी ठरतं.
7/11

ड्रॅगन फ्रूटमुळे शरीर बळकट आणि तंदुरुस्त राहते. हे खाल्ल्याने भूक कमी लागते, त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी हे फळ मदत करतं.
8/11

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांसाठी हे फळ उत्तम आहे. डेंग्यू, मलेरिया आणि कावीळ यांसारख्या आजारांवर हे फळ उपयुक्त ठरते.
9/11

कारण त्यातील व्हिटॅमिन्स आणि खनिजे रक्तातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढवतात आणि रोगांशी लढण्याची ताकद देतात.
10/11

हे फळ नियमित खाल्ल्याने चेहऱ्यावरील निस्तेजपणा कमी होतो आणि त्वचा उजळते. यात असलेले व्हिटॅमिन C त्वचेला नैसर्गिक चमक देतं.
11/11

(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 03 Nov 2025 05:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
विश्व
भारत
























