Hair Care Tips : केसगळतीचं खरं कारण जाणून घ्यायचंय? 'या' 7 टेस्ट करा; लगेच उपचार मिळतील
Hair Care Tips : केस गळण्याच्या समस्येची अनेक कारणे असू शकतात. यावर वेळीच उपचार केल्यास केसगळती बऱ्याच अंशी थांबू शकते.
Hair Care Tips : सध्याच्या काळात अनेकजण केसगळतीच्या समस्येने त्रस्त आहेत. केसगळतीचा (Hairfall) त्रास हा फक्त महिलांनाच नाही तर पुरुषांनाही होतो. त्यामुळे यावर वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे. तसेच, आरोग्याच्या समस्या, ताणतणाव, आहार आणि चिंता यामुळे केस गळण्याची समस्या आजकाल वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत जर तुमचे केस (Hair Care Tips) झपाट्याने गळत असतील तर लगेच ब्लड टेस्ट करावी असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण यवरून तुम्हाला केसगळतीमागे नेमकं काय कारण आहे हे कळू शकते.
केस गळण्याचे नेमके कारण काय?
- अनुवांशिक किंवा हार्मोन्समुळे
- तणाव, चिंता किंवा आघात
- स्वयं प्रतिकारशक्तीमुळे
- महिलेच्या केमोथेरपीनंतर
केसगळतीचे कारण जाणून घेण्यासाठी या टेस्ट करू शकतात.
1. थायरॉईड पातळी
अंडरएक्टिव्ह थायरॉईडमुळे हायपोथायरॉईडीझम होतो आणि ओव्हरएक्टिव्ह थायरॉईडमुळे हायपरथायरॉईडीझम होतो. यावर वेळीच उपचार न केल्यास केस गळण्याची शक्यता असते. थायरॉईड TSH, FT3 आणि FT4 संप्रेरकांच्या निर्मितीसाठी जबाबदार आहे. अशा परिस्थितीत, रक्त तपासणी प्रत्येक हार्मोनची किती निर्मिती होत आहे आणि थायरॉईड कमी किंवा जास्त सक्रिय आहे की नाही हे दर्शविते.
2. सेक्स हार्मोन्स
केसांच्या वाढीसाठी सेक्स हार्मोन्स खूप महत्त्वाचे असतात. स्त्रिया टेस्टोस्टेरॉन तयार करतात, ज्याचे DHT मध्ये चयापचय होते आणि केसांच्या कूपांमध्ये एंड्रोजन रिसेप्टर्सला बांधले जाते. यामुळे ते आकुंचन पावतात आणि केस तयार होणे बंद करतात. रक्त तपासणी लैंगिक हार्मोन्सची पातळी दर्शवते. त्यात टेस्टोस्टेरॉन, ऑस्ट्रॅडिओल, एंड्रोस्टेनेडिओन, प्रोलॅक्टिन आणि एफएसएच ल्युटीन हार्मोन्स असतात.
3. लोह आणि फेरीटिन पातळी
लोहाच्या कमतरतेमुळे म्हणजेच ॲनिमियामुळेही केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. अनेक अभ्यासांमध्ये असे नोंदवले गेले आहे की सीरम फेरीटिन हे रक्तातील प्रथिन आहे ज्यामध्ये लोह आढळते. निरोगी केस असलेल्या स्त्रियांच्या तुलनेत केस गळणाऱ्या महिलांमध्ये त्याची पातळी कमी असते. जेव्हा लोहाची कमतरता असते तेव्हा अलोपेसिया एरियाटा वेगाने विकसित होऊ शकतो. अशा स्थितीत रक्तातील लोह आणि फेरीटिनचे प्रमाण तपासून केसगळती ओळखता येते.
4. होल ब्लड काऊंट
होल ब्लड काऊंट किंवा CBC लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्त पेशी आणि प्लेटलेट्स मोजतात. हे केसांच्या रोमांभोवती जळजळ करू शकतात. हे स्वयंप्रतिकार स्थिती देखील सूचित करू शकते, ज्यामुळे केस गळतात.
5. व्हिटॅमिन डी पातळी
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे ऑटो इम्युनिटी समस्या उद्भवू शकतात. यामुळे ॲलोपेसिया एरियाटा सारख्या ऑटोइम्यून केस गळतीची परिस्थिती देखील होऊ शकते. हार्वर्ड हेल्थच्या संशोधनानुसार, व्हिटॅमिन डीची कमतरता केस गळण्याचे कारण असू शकते.
6. व्हिटॅमिन बी पातळी
व्हिटॅमिन बी मध्ये अनेक वेगवेगळे जीवनसत्त्वे आढळतात. यापैकी बरेच केस गळतीशी जोडलेले आहेत. फोलेट म्हणजेच व्हिटॅमिन बी 9 फोलेटला फॉलिक ऍसिड असेही म्हणतात. त्याच वेळी, बायोटिन म्हणजेच व्हिटॅमिन बी7 आणि व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे केस गळू शकतात.
7. ब्लड शुगर
तुमच्या रक्तातील साखरेची पातळी पाहून तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे ओळखता येऊ शकते. टाईप 2 मधुमेहामुळे देखील केसगळती होते. अशा वेळी ब्लड शुगर टेस्ट केल्याने त्यावर योग्य उपचार घेता येऊ शकतात.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :