Gudi Padwa 2024 Recipes : गुढीपाडव्याचा सण 'या' पदार्थांशिवाय अपूर्णच! सोप्या रेसिपी बनवा, प्रत्येकजण बोटं चाखतील
Gudi Padwa 2024 Recipes : आम्ही तुम्हाला अशा काही खास रेसिपींबद्दल सांगणार आहोत, ज्या पदार्थांशिवाय गुढीपाडव्याचा सण अपूर्ण म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Gudi Padwa 2024 Recipes : गुढीपाडव्याचा सण म्हटला की घरात पदार्थांची (Food) रेलचेल असते, घरात पाहुणेमंडळी येतात, त्यांच्यासाठी खास पदार्थ बनवले जातात. तर गुढीपाडव्याला खास देवाला नैवेद्यासाठी विविध पदार्थ बनविले जातात. मात्र आम्ही तुम्हाला अशा काही खास रेसिपींबद्दल सांगणार आहोत, ज्या पदार्थांशिवाय गुढीपाडव्याचा सण अपूर्ण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 5 सोप्या रेसिपी जाणून घ्या, प्रत्येकजण बोटं चाखतील अशा या पदार्थांच्या साहित्य आणि कृती पाहा..
गोड पुरण पोळी रेसिपी
साहित्य
200 ग्रॅम चणा डाळ, 300 ग्रॅम मैदा, 300 ग्रॅम साखर, 300 ग्रॅम शुद्ध तूप, 6-7 वेलची, 2 ग्रॅम जायफळ, 8-10 केशर.
कृती
सर्व प्रथम, हरभरा डाळ प्रेशर कुकरमध्ये नीट धुवून घ्या, डाळीत दुप्पट पाणी घ्या आणि 30 ते 35 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. 2-3 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करा. कुकर थंड झाल्यावर चणाडाळ स्टीलच्या गाळणीत काढून घ्या, म्हणजे सर्व पाणी निघून जाईल. डाळी थंड झाल्यावर 300 ग्रॅम पैकी 150 ग्रॅम साखर घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. कढईत डाळीचे मिश्रण काढून त्यात उरलेली 150 ग्रॅम साखर घाला. अशा प्रकारे पूर्ण 300 ग्रॅम साखर देखील घाला.
आता हे मिश्रण मंद आचेवर मळून घ्या आणि पुरण गोळे तयार होईपर्यंत शिजवा. पुरण तयार झाल्यावर ते विस्तवावरून काढून थंड करा. वरून जायफळ, वेलची आणि केशर घालून मिश्रणाचे 10-12 गोळे करा.
पुरण पोळी कशी बनवायची?
एका प्लेटमध्ये पीठ गाळून चाळलेले पीठ घ्या. त्यात 1 टेबलस्पून शुद्ध तूप घालून मळून घ्या. त्याचे छोटे-छोटे गोळे करून प्रत्येक गोळ्यात 1 पुरणाचा गोळा घाला, पीठ लावून जाडसर पोळी लाटून घ्या. आता मंद आचेवर गरम तव्यावर शुद्ध तूप लावून दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत शिजवा. अशा प्रकारे सर्व पुरणपोळी बनवा. आता पुरणपोळीला चांगले तूप लावून कढी किंवा आमटीसोबत सर्व्ह करा.
मॅंगो श्रीखंड
साहित्य
अर्धा किलो ताजा चक्का, अर्धा किलो साखर, एक आंबा, दोनशे ग्राम रबडी, वेलची, बदाम आणि पिस्त्याचे काप, इच्छेनुसार केशर.
कृती
सर्व प्रथम एका भांड्यात चक्का घेऊन त्यात साखर मिसळा. आता आंबा सोलून त्याचा रस तयार करा. आंब्याला अशा प्रकारे फेटून घ्या की, त्यात पाणी किंवा दूध घालू नका. जर खूप आवश्यक असेल तर थोडे दूध घाला. आता चक्का आणि आंब्याचा रस एकत्र करा आणि बारीक कापडाने गाळून घ्या. आता त्यामध्ये रबडी घाला. ढवळून घ्या. वेलची, बदाम-पिस्त्याची फोडणी आणि केशर घाला आणि चांगले मिसळा, फेटून थंड करा. अप्रतिम ड्रायफ्रुट्स मिश्रित आंबा श्रीखंड (आम्रखंड) सर्व्ह करा.
कैरीचं गोड-आंबट पन्हं
साहित्य
300 ग्रॅम कैरी (2-3 मध्यम आकाराच्या), 2 चमचे भाजलेले जिरे पावडर, चवीनुसार काळे मीठ, 1/4 चमचे काळी मिरी, 100-150 ग्रॅम (1/2 - 3/4 कप) साखर, 20-30 पुदिन्याची पाने, आवश्यकतेनुसार साधे मीठ.
कृती
सर्वप्रथम कच्चा आंबा धुवून, सोलून घ्या आणि नंतर बिया वेगळा करा, एक किंवा दोन कप पाण्यात टाका आणि उकळवा. आता हा उकडलेला लगदा, साखर, काळे मीठ आणि पुदिन्याची पाने मिक्सरमध्ये घालून चांगले बारीक करून घ्या आणि नंतर त्यात एक लिटर थंड पाणी घालून चाळणीत गाळून घ्या, कैरीचे पन्हे तयार आहे. आता त्यात काळी मिरी आणि भाजलेले जिरे पूड घालून चांगले मिसळा आणि नंतर बर्फाचे तुकडे घाला आणि थंडगार सर्व्ह करा.
अप्रतिम गुलाब जामुन
साहित्य
1 किलो खवा (मावा), एक चमचा दूध, 50 ग्रॅम मैदा, 100 ग्रॅम खाण्यायोग्य ॲरोरूट, 1 किलो साखर, 1 टीस्पून छोटी वेलची, 1/2 चमचे केशर, तळण्यासाठी तूप.
कृती
सर्व प्रथम मावा किसून घ्या. त्यात मैदा आणि ॲरोरूट मिक्स करा. आता हलक्या हाताने मळून घ्या. लहान आकाराच्या गोलाकार गोळ्या करून ठेवाव्यात. आता साखरेत एक ग्लास पाणी घालून पाक बनवा. त्यात दूध घालून ढवळावे आणि मळ वर आल्यावर चमच्याने काढून टाका. आता त्यात वेलची आणि केशर घाला. कढईत तूप गरम करून तयार केलेले गोळे मध्यम आचेवर लाल होईपर्यंत तळून घ्या आणि नंतर पाकात टाका. मस्त गुलाब जामुन तयार आहे. तुमच्या इच्छेनुसार थंड किंवा गरम सर्व्ह करा.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>
Child Health : मुलांना मोमोज, पिझ्झा, बर्गर, नूडल्स देताय? जरा थांबा, ही बातमी वाचा.. 250 मुलांवर केलेल्या संशोधनात धक्कादायक खुलासा!