Health Tips : वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी गुणकारी! हा चहा बनविण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
Green Tea Receipe : तुम्हीही ग्रीन टी बनवत असाल तर ती कशी बनवावी हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
Green Tea Receipe : वाढलेलं वजन कमी करण्यासाठी असो किंवा पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात आधी ग्रीन टी (Green Tea) चा वापर केला जातो. ग्रीन टी हे सर्वात आरोग्यदायी पेय मानले जाते. लठ्ठपणा टाळण्यासाठी ग्रीन टीचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. तुम्हीही ग्रीन टी बनवत असाल तर ती कशी बनवावी हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला ग्रीन टी बनवण्याची योग्य पद्धत कोणती आहे, तसेच कोणत्या वेळी ग्रीन टी पिणे तुमच्यासाठी चांगले राहील हे सांगणार आहोत.
ग्रीन टी बनवण्याची योग्य पद्धत
ग्रीन टी बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
- दोन कप पाणी घ्या.
- यानंतर आल्याचा तुकडा कापून घ्या.
- दोन वेलची घ्या.
- किमान दहा पुदिन्याची पाने.
- तुळशीची दहा पाने घ्या.
- एक चमचा लिंबाचा रस.
- दोन चमचे मध घ्या.
ग्रीन टी बनविण्यासाठीची कृती :-
सर्वात आधी एका भांड्यात 2 कप पाणी मध्यम आचेवर उकळू द्या. नंतर त्यात ठेचलेले आले घाला. नंतर चांगली उकळ यायला लागल्यावर तुळस आणि पुदिना धुवून उकळलेल्या पाण्यात टाका, आणि गॅस बंद करा. त्यानंतर एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. आता कपमध्ये 1-1 चमचा मध टाका आणि चमच्याने सगळे मिश्रण मिक्स करा.
जाणून घ्या हा चहा पिण्याची योग्य पद्धत
एका अभ्यासानुसार, ग्रीन टी पिण्याचा योग्य मार्ग म्हणजे तो जास्त प्रमाणात पिणे नाही. दिवसातून एकदाच ग्रीन टी घेणे चांगले. याशिवाय, रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र, आरोग्य तज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी ग्रीन टीचे सेवन केल्याने नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी हा चहा घेऊ शकता. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी मध मिसळून प्यावी. जेवणापूर्वी एक तास आधी आणि नंतर ग्रीन टी पिणे चांगले. याशिवाय ग्रीन टीमध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्यानेही फायदा होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :