Ganesh Chaturthi 2024 : बाप्पा येतायत..झाली का तयारी? आवश्यक साहित्याची 'ही' यादी सेव्ह करून ठेवा, उपयोगी पडेल.!
Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीच्या वेळी गणेश मूर्तीची पूजा करण्यासाठी विविध साहित्याची आवश्यकता असते. आवश्यक वस्तूंची यादी येथे आहे.
Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय, या सणाची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी भगवान गणेशाची पूजा केली जाते, गणपती बाप्पाला बुद्धीची देवता मानली जाते. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी साजरी होत आहे. या दिवशी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून 10 दिवस विधीवत पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन होते.
गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी आवश्यक वस्तूंची यादी, लक्षात ठेवा
गणेश चतुर्थीच्या वेळी गणेशाची पूजा करण्यासाठी विविध साहित्याची आवश्यकता असते. जर तुम्हीही गणपती स्थापना करत असाल तर अगोदर तयारी पूर्ण करा आणि पूजेसाठी आवश्यक वस्तू घरी आणा. गणेश चतुर्थीसाठी आवश्यक वस्तूंची यादी येथे आहे.
गणपती बाप्पाची मूर्ती
गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी सर्वप्रथम गणेशाची मूर्ती आवश्यक असते. ही मूर्ती मातीची असावी जेणेकरून विसर्जनाच्या वेळी पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही.
चौरंग किंवा पाट
श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी चौरंग किंवा पाट आवश्यक आहे. ते पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड त्यावर पसरावा.
लाल कापड आणि विड्याची पाने
गणपतीची मूर्ती लाल रंगाच्या कापडाने सजवली जाते. तसेच विड्याचा पानांचाही वापर केला जातो, कारण ती गणपतीला अतिशय प्रिय आहे.
कलश आणि नारळ
पूजेच्या ठिकाणी कलश स्थापित केला जातो, ज्यामध्ये पाणी, आंब्याची पाने आणि नारळ ठेवतात.
पान, सुपारी, आणि हळद
पूजेच्या वेळी पान, सुपारी आणि हळद यांचा वापर केला जातो. श्रीगणेशाच्या पूजेमध्ये हे साहित्य महत्त्वाचे मानले जाते.
दुर्वा
दुर्वा (तीन पाने असलेली ) गणपतीला अतिशय प्रिय आहे. त्याचा पूजेत समावेश केला पाहिजे.
मोदक आणि लाडू
गणपतीला मोदक आणि लाडू अर्पण केले जातात. हे त्यांचे आवडते पदार्थ मानले जाते.
धूप, अगरबत्ती आणि दिवे
पूजेच्या वेळी धूप, अगरबत्ती आणि तुपाचे दिवे लावणे आवश्यक आहे. त्यामुळे वातावरण शुद्ध आणि सुगंधित होते.
फुले आणि हार
गणपतीची मूर्ती सजवण्यासाठी ताजी फुले आणि हार लागतात. गणपतीला विशेषतः लाल आणि पिवळी फुले आवडतात.
चंदनाची गोळी, कुंकू
पूजेसाठी रोळी आणि कुंकू देखील वापरतात. यासह श्रीगणेशाचा टिळक केला जातो.
पंचामृत
दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून बनवलेले पंचामृत गणेशाला अभिषेक करण्यासाठी वापरले जाते.
हेही वाचा>>>
Ganesh Chaturthi 2024 : आतुरता तुमच्या आगमनाची! बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी करा 'अशी' फर्स्ट क्लास सजावट, प्रत्येकजण करेल कौतुक
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )