(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganesh Chaturthi 2024 : आतुरता तुमच्या आगमनाची! बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी करा 'अशी' फर्स्ट क्लास सजावट, प्रत्येकजण करेल कौतुक
Ganesh Chaturthi 2024 : यंदा गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही बाप्पाची मूर्ती बसवण्याची तयारी करत असाल तर या टिप्सचा अवलंब करून घर, मंदिर सजवू शकता.
Ganesh Chaturthi 2024 : यंदा गणेश चतुर्थीचा (Ganeshotsav 2024) सण 7 सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. दरवर्षी भाद्रपद मासातील शुक्ल चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi 2024) सण साजरा केला जातो. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या घरात समृद्धी, सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गणेशाची प्रतिष्ठापना करतात. घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी, मंदिरात गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. यासाठी लोक आपली घरं, मंडप आणि मंदिरं अतिशय आकर्षक पद्धतीने सजवतात. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही घरी किंवा मंडपात सजावट करू शकतात.
मंदिर आणि घराच्या सजावटीसाठी टिप्स
गणेशोत्सव म्हटला की सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. आपल्या बाप्पाच्या अवतीभवती सुंदर सजावट करतात. भाविक गणेशमूर्तीला फुलं, फळं, मिठाई आणि विविध प्रकारच्या नैवेद्यांनी सजवतात. यावेळी विशेष पूजा आणि भजन-कीर्तनाचेही आयोजन करण्यात येते. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे दहाव्या दिवशी होणाऱ्या गणेशमूर्तीचे विसर्जन. जर तुम्हीही यावर्षी तुमच्या घरात गणपतीची मूर्ती बसवत असाल तर मंदिर आणि घराच्या सजावटीसाठी तुम्ही या टिप्सचा अवलंब करू शकता.
योग्य जागा
सर्वप्रथम, गणपतीची मूर्ती ठेवण्यासाठी घरातील सर्वात पवित्र स्थान निवडा. ही जागा स्वच्छ असावी. तसेच, येथील जागाही योग्य असावी जेणेकरून पूजा-अर्चा आणि दर्शन करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
रंगीत कपडे
गणपतीच्या पूजेच्या ठिकाणी रंगीबेरंगी कपडे. जसे सुंदर साडी आणि दुपट्टा वापरता येतो. सजावटीसाठी तुम्ही ते मागील भिंतीवर अनेक प्रकारे लावू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही गणपतीची प्रतिष्ठापना करत आहात तेथे पवित्र आणि सुंदर वस्त्रे पसरवा.
फुलांची व्यवस्था
गणपतीच्या मूर्तीभोवती रंगीबेरंगी फुलांचा हार घालू शकता. यासाठी झेंडू, गुलाब आणि चमेलीच्या फुलांचा वापर करू शकता. हे देखील पूजेसाठी शुभ मानले जातात. तसेच त्यांचा सुगंध पूजास्थळी दरवळत राहील. आपण सजावटीसाठी कृत्रिम फुले देखील वापरू शकता. उदाहरणार्थ, भिंती सजवण्यासाठी तुम्ही कृत्रिम फुले वापरू शकता.
लाईटिंग
घरामध्ये तसेच ज्या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना केली जाते त्या ठिकाणी रंगीबेरंगी दिवे लावा. विशेषत: गणेशमूर्तीच्या आजूबाजूला प्रकाशयोजना करून ती जागा तुम्ही सजवू शकता.
रंगीत कागद आणि फुगे
आपण सजावटीसाठी रंगीत कागद देखील वापरू शकता. यासाठी रंगीत कागदांपासून फुले, पंखे, झालर, छत्री, फुलपाखरे, भिंतीवरील हँगिंग्ज अशा वस्तू बनवून सजावटीसाठी वापरा, 10 दिवस असेच राहतील. याच्या मदतीने तुम्ही फुग्याने मंदिर सजवू शकता. तुम्ही रंगीबेरंगी फुग्यांसह भिंती सजवू शकता. यासाठी तुम्ही दोन रंगांच्या रंगसंगती असलेले फुगे वापरून सजावट करू शकता.
आणखी वाचा
Konkan Railway: गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी गुड न्यूज, 20 स्पेशल ट्रेन, बुकिंग कधीपासून सुरु होणार?