(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Food : उपवास असताना सर्वांनाच पडणारा प्रश्न! काय खावं? काय खाऊ नये? इथे मिळेल उत्तर
Food : नवरात्रीचा उपवास सुरू आहे, अशा परिस्थितीत लोक उपवासात अनेक प्रकारच्या भाज्या खातात. पण तुम्हाला माहित आहे का की अशा काही भाज्या आहेत ज्या उपवासात खाऊ नयेत.
Food : उपवास म्हटला की सर्वांच्याच मनात एक प्रश्न असतो, तो म्हणजे काय खावं आणि काय खाऊ नये? अनेक जण याच संभ्रमात असतात, साबुदाण्याची खिचडी, बटाटा, फळं हे सर्वांनाच माहित आहे. मात्र अशा कोणत्या भाज्या आहेत? ज्या आपण उपवासात खाऊ शकतो, किंवा कोणत्या खाऊ नये? जाणून घ्या
उपवासात अन्नाची विशेष काळजी
9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक भाविक नऊ दिवस उपवासही ठेवतात. लोक त्यांच्या श्रद्धेनुसार आणि शक्तीनुसार उपवास करतात. काही लोक तर केवळ फळं खाऊन उपवास करतात, तर काही लोक एकाच वेळी सात्विक अन्न खाऊन उपवास करतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात अन्नाची विशेष काळजी घेतली जाते. या उपवासात अनेक गोष्टी आहेत, ज्यांचे सेवन करण्यास मनाई आहे, परंतु लोक नकळत त्या सामान्य भाज्या समजून खातात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत की नवरात्रीच्या उपवासात तुम्ही कोणत्या भाज्या खाऊ शकता?
बटाटा
उपवासात बटाट्याची भाजी खाऊ शकता. बटाटे तळून खाण्याबरोबरच लोक ते उकळवूनही खडे मीठ टाकून खातात. अनेकांना आलू टिक्की तुपात तळून खायला आवडतात. बरेच लोक उपवासात बटाट्याची खीर तयार करतात आणि प्रसाद म्हणून खातात.
रताळे
उपवासात रताळेही खाऊ शकतात. लोकांना रताळ्यापासून खीर आणि हलवा बनवून खायला आवडते. यासोबतच लोक याला टिक्की आणि फ्राईज सारखे खातात. रताळ्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात (रताळे खाण्याचे फायदे), ज्यामुळे उपवासाच्या वेळी अशक्तपणा जाणवत नाही.
गाजर
नवरात्रीच्या उपवासातही तुम्ही गाजराचे सेवन करू शकता. गाजराची खीर असो किंवा साधी कोशिंबीर, दोन्ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तुम्ही सकाळी गाजराचा रस देखील घेऊ शकता.
काकडी
काकडी उपवासाच्या वेळी खाण्यायोग्य आहे. हे खाल्ल्याने तुमच्या शरीरात अशक्तपणा आणि पाण्याची कमतरता होणार नाही. काकडी खाण्याव्यतिरिक्त, तुम्ही रायता किंवा कोशिंबीर बनवून देखील खाऊ शकता.
केळी
पिकलेली केळी उपवासात खातात, पण आम्ही तुम्हाला सांगतो की उपवासात तुम्ही कच्च्या केळ्याचेही सेवन करू शकता. तुम्ही कच्च्या केळ्यापासून शिरा आणि चिप्स देखील बनवू शकता आणि ते तुमच्या उपवासाच्या अन्नात समाविष्ट करू शकता.
पपई
लोक उपवासाच्या वेळी पिकलेल्या पपईचे रस किंवा सॅलडच्या रूपात सेवन करतात. जर तुमच्याकडे कच्ची पपई असेल तर तुम्ही हलवा, खीर किंवा बर्फी बनवून खाऊ शकता.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mango Recipes : मॅंगो बर्फी.. मँगो कँडी...आंबा शिरा..! तोंडाला पाणी सुटलं? आंब्यापासून बनवलेल्या 'या' अप्रतिम रेसिपी पाहा, उन्हाळ्याचा आनंद घ्या