Food : आलू पराठापेक्षाही वेगळं आणि टेस्टी! नाश्त्यासाठी हे 3 प्रकारचे पराठे ट्राय करा, प्रत्येकजण म्हणेल 'वाह'!
Food : फक्त बटाटे आणि कांदेच नाही तर नाश्त्यासाठी हे 3 प्रकारचे पराठे करून पाहा; जेवल्यानंतर प्रत्येकजण 'वाह' म्हटल्याशिवाय राहणार नाही
Food : आलू पराठा...प्याज पराठा...गोबी पराठा...तोंडाला पाणी सुटलं ना? हे असे पराठे आहेत, जे आपल्या घरात नेहमी बनत असतात. सकाळी ब्रेकफास्टमध्ये हे पराठे खाल्ले की पोट कसं भरल्यासारखं वाटतं ना..! अनेकांना नाश्त्याला पराठा खायला आवडतो, ही ब्रेकफास्ट रेसिपी म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच आवडीची... पराठा हा केवळ एक स्वादिष्ट भारतीय पदार्थच नाही तर याने दीर्घकाळ पोट भरलेले राहते. सकाळी इतर काही खाण्यापेक्षा पराठे हे कितीतरी पटीने आरोग्यासाठी चांगले आहे. नॉर्मली तुम्ही कांदा किंवा बटाट्याचे पराठे अगदी आवडीने खात असाल, पण आज आम्ही तुम्हाला पराठ्यांचे 3 वेगवेगळे पर्याय सांगणार आहोत. जे खाल्ल्यानंतर सर्वजण बोटं तर चाखतीलच पण सोबत गोड कौतुकही हौईल
आलू पराठा पेक्षाही वेगळं आणि टेस्टी! 'त्या' 3 पराठ्यांबद्दल जाणून घ्या
नाश्त्यात बटाटे, कांदे किंवा साधा पराठा सर्वांनाच आवडतो, पण अनेकदा रोजच त्याच चवीचा कंटाळा येतो. अशात तुम्हाला ब्रेड किंवा टोस्ट खाण्याची गरज नाही, कारण येथे आम्ही तुम्हाला अशाच 3 पराठ्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची नावे तुम्ही ऐकलीही नसतील. हे पराठे केवळ चवीनुसारच उत्कृष्ट नाहीत, परंतु ते तयार करताना जास्त वेळही घेत नाहीत. जाणून घेऊया..
पापड पराठा
कुरकुरीत किंवा चविष्ट खाण्यासाठी पापड पराठा हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी सर्वात आधी पापड तळून घ्यायचे आहेत, ते ठेचून त्यात तूप, तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. नंतर हे सारण पराठ्यात टाकून तव्यावर भाजून घ्या.
भाताचा पराठा
रात्री उरलेल्या भाताचा उत्तम वापर करायचा असेल तर भाताच्या पराठ्यापेक्षा चांगला पर्याय काय असू शकतो. या रेसिपीच्या मदतीने भाताचा शिळेपणा देखील बऱ्याच प्रमाणात दूर होतो आणि त्याला चवही लागते. त्यासाठी कांदा, हिरवी मिरची, तिखट, हिरवे धणे आणि चवीनुसार मीठ घालून त्याचे सारण तयार करा आणि सामान्य पराठ्याप्रमाणे बेक करून सर्व्ह करा.
भुजिया पराठा
जर तुम्हाला नाश्त्यात काहीतरी वेगळं खायचं असेल तर भुजिया पराठा हा देखील एक उत्तम पर्याय आहे. त्यासाठी एका बाऊलमध्ये भुजिया, मिरची पावडर, हिरवे धणे आणि चवीनुसार मीठ घालावे लागेल. त्यानंतर तुम्हाला सामान्य पराठ्याप्रमाणेच बेक करावे लागेल.
हेही वाचा>>>
Food : पावसाळ्यात भाज्यांचे भाव वाढतात, 'या' भाज्या अशाप्रकारे वाळवून वापरा, महागाईच्या तडाख्यापासून वाचाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )