एक्स्प्लोर

Food : वीकेंड होईल फर्स्ट क्लास! जेव्हा कुटुंबासाठी टेस्टी 'चिकन कीमा मटर' बनवाल, सर्वजण करतील कौतुक, रेसिपी जाणून घ्या..

Food : तुम्हीही चिकनचे शौकीन असाल आणि नेहमीच्या पद्धतीने ते खाण्याचा कंटाळा आला असाल तर यावेळी तुम्ही चिकन कीमा मटर ट्राय करू शकता.

Food : शनिवार-रविवार म्हटलं की अनेकांसाठी स्पेशल असतो. विशेष म्हणजे मांसाहार खवय्यांसाठी तर पर्वणीच असते, अनेक मांसाहार खवय्यांना चिकन खूप आवडते. चिकनमध्ये प्रथिने भरपूर असल्याने ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. अनेक खवय्यांसाठी प्रत्येक वेळी त्याच पद्धतीने चिकन बनवणे कंटाळवाणे ठरते. जर तुम्हीही चिकनचे शौकीन असाल आणि नेहमीच्या पद्धतीने ते खाण्याचा कंटाळा आला असाल तर यावेळी तुम्ही चिकन कीमा मटर ट्राय करू शकता. हा पदार्थ तुम्ही कुटुंबियांसाठी बनवाल तर सर्वजण बोटं चाखतील. रेसिपी जाणून घ्या

चिकन हा प्रोटीनचा चांगला स्रोत

मांसाहार प्रेमी चिकन मोठ्या आवडीने खातात. ही अनेकांची आवडती डिश आहे. हे स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. चिकन हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे, जे खाल्ल्याने शरीरात प्रोटीनची कमतरता होत नाही. लोकांना ते त्यांच्या आवडीनुसार खायला आवडते. चिकन बिर्याणी असो किंवा बटर चिकन असो, लोक साधारणपणे अशा पद्धतीने चिकन तयार करण्याचा आनंद घेतात. मात्र, प्रत्येक वेळी असेच खाणे कधीकधी कंटाळवाणे होते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला काही नवीन करून पहायचे असेल तर यावेळी तुम्ही चिकन किमा मटर बनवू शकता. चला जाणून घेऊया चिकन कीमा मटरची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी-

साहित्य

1 किलो चिरलेला चिकन

1 1/2 कप हिरवे वाटाणे

4 वेलची

2 तमालपत्र

1/2 टीस्पून काळी मिरी

1/2 टीस्पून जिरे

2 चमचे आले-लसूण पेस्ट

1 1/2 कप बारीक चिरलेला कांदा

2 कप बारीक चिरलेला टोमॅटो

1/2 कप दही

1 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर

1 टीस्पून धणे पावडर

1 टीस्पून गरम मसाला

2 चमचे कसुरी मेथी

2 चमचे चिकन मसाला

तूप/तेल (पसंतीनुसार)

मीठ (चवीनुसार)

बनवण्याची पद्धत

एक पॅन घ्या आणि त्यात थोडे तेल गरम करा. गरम झाल्यावर त्यात तमालपत्र, काळी वेलची, मिरपूड घालून ते सुगंधित होऊन तपकिरी होईपर्यंत शिजवा.

आता जिरे घाला आणि ते तडतडायला लागेपर्यंत परतून घ्या. यानंतर आले-लसूण पेस्ट घालून कच्चापणा जाईपर्यंत शिजवा.

नंतर गॅस मध्यम-मंद करा आणि पॅनमध्ये चिरलेला कांदा घाला, तो गुलाबी होईपर्यंत शिजवा.

आता त्यात चिरलेला टोमॅटो घालून मिक्स करा. पॅनचे झाकण झाकून ठेवा जेणेकरून सर्व साहित्य चांगले मिसळून टोमॅटो मऊ होतील.

तेल वेगळे व्हायला लागल्यावर त्यात धनेपूड, काश्मिरी तिखट, गरम मसाला पावडर आणि मीठ असे कोरडे मसाले घाला.

आता थोडे दही फेटून त्यात कसुरी मेथी घाला. चांगले मिसळा आणि इतर घटकांसह मिक्स करण्यासाठी पॅनमध्ये घाला.

तेल सुटू लागले की त्यात स्वच्छ धुतलेला चिकन खिमा घाला. सतत ढवळत राहा, म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत. पॅनमध्ये खिमा मसाला घाला आणि चांगले मिसळा.

चिकन किमा मटर तयार आहे. चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून सजवा आणि सर्व्ह करा.

हेही वाचा>>>

Food :'अशी कशी देवाची करणी!' नारळाच्या आत पाणी नेमकं येतं कुठून? माहीत नसेल तर जाणून घ्या

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीनता; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : ED च्या सुटकेपासून नव्हे, तर विकासासाठी भाजपसोबत - छगन भुजबळSupriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या?Sanjay Raut Full PC : शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं; शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीनता; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Sanjay Raut: एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
एकनाथ शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत; शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: संजय राऊत
Embed widget