First Diwali After Marriage: लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी करणाऱ्या जोडप्यांसाठी खास टीप्स
First Diwali After Marriage: दोन दिवसांपासून दिवाळी (Diwali 2021) साजरी केली जात असून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येकाच्या आयुष्यात नवा आनंदोत्सव म्हणून या सणाकडे पाहिले जाते.
First Diwali After Marriage: देशभरात दोन दिवसांपासून दिवाळी (Diwali 2021) साजरी केली जात असून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्येकाच्या आयुष्यात नवा आनंदोत्सव म्हणून या सणाकडे पाहिले जाते. हा सण नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी अधिक खास असतो. प्रत्येक जोडप्यांना त्यांची पहिली दिवाळी खास पद्धतीने साजरी करायची असते. या सणानिमित्त अनेक गोड आठवणी आयुष्यभर त्यांच्या स्मरणात राहतील, असा नव्या जोडप्यांचा प्रयत्न असतो. अशा नवविवाहित जोडप्यांना त्यांची पहिली दिवाळी आणखी खास बनवण्यासाठी खालील टीप्स महत्वाच्या ठरू शकतात.
हे देखील वाचा- Diwali 2021: दिवाळीला झटपट मेक-अप करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
लग्नानंतरची तुमची पहिली दिवाळी असेल तर, पत्नीला आवडती वस्तू भेट देऊन तिच्या आनंदात भर घालता येईल. यासाठी तुम्हाला पत्नीच्या आवडीनिवडी जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यानंतरच भेटवस्तू देणे योग्य ठरेल. महत्वाचे म्हणजे, पत्नीला देण्यात येणारी भेटवस्तू आयुष्यभर स्मरणात राहील, अशी असावी.
दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात नव्या कपड्यांसह अन्य वस्तूची खरेदी केली जाते. दिवाळीची खरेदी करताना नव्या जोडप्यांनी सोबत जायला हवे. या काळात आपल्या जोडीदारासह जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे नव्या जोडप्यांना एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेता येईल.
हे देखील वाचा-Diwali 2021: दिवाळीमध्ये भेसळयुक्त मिठाईपासून सावध राहा; खरेदी करताना ही घ्या काळजी
दिवाळी सणानिमित्त प्रत्येक घरात मिठाई किंवा खाद्यपदार्थ तयार केले जातात. यावेळी तुम्ही पत्नीला स्वयंपाक घरात मदत करू शकतात. यामुळे तुमच्या पत्नीचा नातेवाईकांशी संपर्क वाढेल. याचबरोबर पत्नीला नातेवाईकांच्या घरी घेऊन जावे.