(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fashion : सोनेरी नक्षी..काळ्या अनारकलीत अवतरली अप्सरा..! 50 वयातही विश्वसुंदरीचा जलवा कायम, दुबईत माय-लेकीचा भारतीय अंदाज, एकदा पाहाच..
Fashion : नेहमीप्रमाणे तिची लाडकी लेक आराध्या बच्चनसह समारंभात सहभागी होण्यासाठी आलेली ऐश्वर्या राय बच्चन रेड कार्पेटवर येताच चर्चेत आली.
Fashion : वय वर्षे 50... दिसायला जणू अप्सरा... विश्वसुंदरी...बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनचे (Aishwarya Rai Bachchan) संपूर्ण जगात चाहते आहेत. तिचं दिसणं...तिचं हसणं... तिची लाईफस्टाईल..तिचं वैयक्तिक जीवन नेहमीच चर्चेत असतं. ज्यामुळे अनेक जण तिला फॉलो करताना दिसतात. नेहमीप्रमाणे लाडकी लेक आराध्यासह ऐश्वर्या राय बच्चन रेड कार्पेटवर येताच चर्चेत आली. निमित्त होतं ते दुबईतील सिमा अवॉर्ड्स सोहळ्याचं...! तिच्या चकाकणाऱ्या पोशाखाची आणि चेहऱ्यावरची चमक सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वेधून घेत होती. ऐश्वर्याने आपल्या स्टाईलने पुन्हा एकदा दाखवून दिले की 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी तीच सौंदर्यवती आहे. वयाच्या 50 व्या वर्षी अभिनयासोबतच सौंदर्यातही कमी नसणाऱ्या या अभिनेत्रीने अवॉर्ड फंक्शन्सवरही आपला दबदबा निर्माण केला.
हातात धरले हात.. माय-लेकीचा अनोखा अंदाज
दुबईतील दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (SIIMA) समारंभात ऐश्वर्या राय, नयनतारा आणि चियान विक्रम यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तमिळ इंडस्ट्रीतील 'पोनियिन सेल्वन 2' मधील दमदार अभिनयासाठी विक्रमला पुरस्कार मिळाला, तर ऐश्वर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) पुरस्कार मिळाला. ऐश्वर्या राय बच्चन तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत सिमा अवॉर्ड्स सोहळ्यात दिसली. रॅट कार्पेट इव्हेंटमध्ये आई-मुलीची जोडी हात धरताना दिसली. ऐश्वर्याचा काळ्या रंगाचा अनारकली सेट आणि आराध्याचा चांदीचा चमकणारा को-ऑर्ड सेट तिला आणखीनच सुंदर बनवत होता. यादरम्यान ऐश्वर्याने चाहत्यांसोबत पोज दिली आणि सेल्फीही काढला.
ऐश्वर्याचा काळा अनारकली पोशाख खास
ऐश्वर्याने अवॉर्ड शोसाठी घातलेला काळा अनारकली गाउन सेट क्लिष्ट पॅटर्नमध्ये चमकदार गोल्ड सिक्विन भरतकामाने तयार केलेला आहे. अनारकली कुर्त्यामध्ये हेमलाइन, फुल स्लीव्हज आणि व्ही स्लिट असलेली बंद गळ्याची कॉलर आहे. जे फ्लोय सिल्हूटमध्ये कॅस्केडिंग स्कर्टसह अगदी परिपूर्ण दिसते. ऐश्वर्या राय बच्चनने अनारकली गाऊनला मॅचिंग ब्लॅक जरी दुपट्टा स्टाईल केला होता. यात कुर्त्याची गोल्डन सिक्विन एम्ब्रॉयडरी आहे, तर बॉर्डरवर झुमकी जोडलेली आहेत. तिने तिच्या खांद्यावर हा सुंदर स्वीपिंग लांबीचा दुपट्टा ओढून लुक पूर्ण केला.
कमी दागिन्यात उठून दिसली अप्सरा
यंदा अनंत -राधिका अंबानीच्या लग्नातील तिच्या लूकमुळे ऐश्वर्या खूप ट्रोल होताना दिसली, मात्र यंदा तिच्या पोशाखाची चमक कायम ठेवण्यासाठी ऐश्वर्याने कमीत कमी दागिन्यांची निवड केली. तिने सोन्याचे डायमंड कट झुमका कानातले आणि स्टेटमेंट रिंग घातली होती. तर ग्लॅमसाठी ग्लॉसी पिंक शेडची लिपस्टिक, मॅचिंग आय शॅडो आणि रुज टिंटेड आय शॅडो आणि विग्ड आयलायनर आणि मस्करा लावले होते.
आराध्याने दिला आईला आधार
आराध्या बच्चनने तिच्या आईसोबत ट्विन करण्यासाठी चमकदार पोशाख परिधान केला होता. त्यात फुल स्लीव्हज आणि गोल नेकलाइनसह काळा शॉर्ट कुर्ता आणि पलाझो सेट होता. पोशाखात सोनेरी ऐवजी सिल्व्हर सिक्विन एम्ब्रॉयडरी आहे. साइड स्लिट आणि आरामदायक सिल्हूट जबरदस्त आकर्षक लुक देत होते. आराध्याने कोणताही दागिना न घालता फक्त सिल्व्हर बेली शूज घालून तिचा लूक पूर्ण केला.
हेही वाचा>>>
Ganeshotsav Fashion : मोत्याचे दागिने...बांधणी साडी...60 वर्षांच्या नीता अंबानींनी सौंदर्यात सुनेलाही टाकलं मागे! गणेशोत्सव लूक पाहताच सर्वांच्या भुवया उंचावल्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )