Fashion : बाहेर पाऊस, चेहऱ्यावरील मेकअप टिकेल? 'या' टिप्स फॉलो कराल, तर अजिबात उतरणार नाही मेकअप!
Fashion : पावसाळ्यात अनेकदा मेकअप केल्यानंतर त्वचा चिकट दिसते आणि मेकअपही जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत
![Fashion : बाहेर पाऊस, चेहऱ्यावरील मेकअप टिकेल? 'या' टिप्स फॉलो कराल, तर अजिबात उतरणार नाही मेकअप! Fashion lifestyle marathi news face makeup in rain If you follow these tips for long lasting makeup in monsoon Fashion : बाहेर पाऊस, चेहऱ्यावरील मेकअप टिकेल? 'या' टिप्स फॉलो कराल, तर अजिबात उतरणार नाही मेकअप!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/a0dce0d8994ccf3589c89b3329f4c70e1719044577818381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Fashion : मेकअप म्हटलं की प्रत्येक स्त्रीचा जीव की प्राण.. नाही का? कुठेही गेलो तरी लहानांपासून मोठ्यांना मेकअप करायला आवडतो. कार्यक्रम कुठलाही असो, लाईट ते डार्क असे सर्व प्रकारचे मेकअप महिला करतात. आजकाल तर मेकअपचे विविध ट्रेंड्स पाहायला मिळत आहेत. बदलत्या ब्युटी ट्रेंडमुळे, तुम्हाला या साठीचे अनेक व्हिडिओ ऑनलाईन देखील पाहायला मिळतील. मेकअप करताना त्वचेचा प्रकार समजून घेणे महत्त्वाचे असले तरी हवामानाची विशेष काळजी घेणंही तितकच गरजेचं आहे. तसं पाहायला गेलं तर, पावसाळ्यात अनेकदा मेकअप केल्यानंतर त्वचा चिकट दिसते, मेकअपही जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पावसाळ्यात सहज मेकअप करू शकाल आणि चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवू शकाल.
मेकअपसाठी कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट निवडायचे?
पावसाळ्यात चेहऱ्याची त्वचा आधीच तेलकट होऊ लागते. मेकअप केल्यानंतर त्वचा चिकट वाटू लागते. हे टाळण्यासाठी, मेकअपसाठी लिक्वीड किंवा क्रीम उत्पादनं टाळण्याचा प्रयत्न करा. त्याऐवजी पावडर उत्पादनांचा तुमच्या व्हॅनिटीमध्ये समाविष्ट करा. याशिवाय बेस मेकअप हलका ठेवा. हवं असल्यास फाउंडेशन वगळू शकता. त्याऐवजी तुम्ही कन्सीलर वापरू शकता.
मेकअप दीर्घकाळ कसा ठेवायचा?
मेकअप दीर्घकाळ टिकण्यासाठी, प्रत्येक टप्प्यांचं अनुसरण करणं खूप महत्वाचं आहे. यासाठी मेकअप सुरू करण्यापूर्वी फेस प्राइमर वापरा. यानंतर शेवटी सेटिंग स्प्रेच्या मदतीने मेकअप व्यवस्थित सेट करा. याशिवाय, लूज पावडरच्या मदतीने मेकअप सेट करा. असं केल्याने मेकअप खराब होणार नाही.
त्वचेच्या काळजीवर देखील विशेष लक्ष दिले पाहिजे
अनेक तंत्र मेकअपसाठी वापरली जातात, परंतु लॉंग लास्टींग लुक मिळविण्यासाठी, आपण केवळ मेकअपवरच नव्हे तर त्वचेच्या काळजीवर देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी, तुमच्या त्वचेचा प्रकार आणि ऋतूनुसार मेकअप करण्यापूर्वी योग्य त्वचेची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. याशिवाय त्वचा निरोगी ठेवते. तुमची त्वचा जितकी निरोगी असेल, तितका तुमचा मेकअप अधिक दिसेल आणि लॉंग लास्टींग लुक देण्यात मदत करेल.
हेही वाचा>>>
Fashion : मान्सून फर्स्ट क्लास.. फॅशन झक्कास! पावसाळ्यात स्टायलिश दिसायचंय तर 'हे' कपडे नक्की ट्राय करा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)