LPG Cylinder : घरगुती गॅस सिलेंडरही एक्स्पायर होतात, अशाप्रकारे जाणून घ्या!
LPG: तुमच्या घरातील एक सिलेंडर टाकी साधारण 15 वर्षापर्यंत चालते. याकाळात सिलेंडरची दोन वेळ तपासणी केली जाते. या सिलेंडरची एक्सपारी डेटच त्याची टेस्टिंग डेट असते. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...
LPG Cylinder Expiry : जेव्हा आपण बाजारातून एखादी वस्तू खरेदी तेव्हा त्यावरील आधी एक्स्पायरी डेट तपासतो आणि वस्तू विकत घेतो. आरोग्याच्या दृष्टीने ही जागरुकता खूप गरजेचीसुद्धा आहे. यानंतरही बाजारात एक्स्पायरी डेट संपल्यानंतरही वस्तू विकल्या जातात. पण आपण त्यावर फारसं लक्ष देत नाहीत. यापैकीच एक वस्तू आहे LPG gas cylinder. याचा आपल्या दररोजच्या आयुष्याशी संपर्क येत असते. घरगुती सिलेंडरवर एक्स्पायरी डेट (LPG Cylinder Expiry) लिहिलेली असते याची बहुतांश लोकांना काहीच कल्पना नसते. आपण सिलेंडर घेताना त्यामधील गॅस लीक होत नाही ना, याची तापासणी करतो. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याची एक्स्पायरी डेट चेक करत नाही. सध्या देशात बहुतांश लोकांच्या घरी घरगुती गॅस कनेक्शन आली आहेत. तरीही बऱ्याच लोकांना एलपीजी सिलेंडरवर एक्स्पायरी डेट लिहिलेली असते हे माहित नसतं. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया....
ABCD या अक्षरांचा अर्थ
गॅसच्या या ठिकाणी लिहिलेली असते एक्स्पायरी डेट
कोणत्याही एलपीजी सिलेंडरवर ज्या तीन पट्ट्या असतात, त्यावर ठळक अक्षरामध्ये एक कोड लिहिलेला असतो. हा कोड म्हणजेच सिलेंडरची एक्स्पायरी डेट. हा कोड A-24, B-25, C-26 आणि D-27 असा असतो. या कोडमधील ABCD ही इंग्रजी अक्षरे महिना दर्शवतात, तर त्यामागील लिहिलेला क्रमांक कोणतं वर्ष आहे, याची माहिती देतात. आता या कोडवरुन सिलेंडरची एक्स्पायरी कशी समजते ते समजून घेऊया. याला या कोडमध्येच टेस्टिंग डेट दिलेली असते. यालाच Test Due Date असंही म्हणतात.
ABCD या इंग्रजी अक्षरांचा अर्थ
ABCD या इंग्रजी अक्षरांना तीन-तीन महिन्यांच्या गटात विभागणी केली जाते.
A अक्षराचा अर्थ- जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च
B अक्षराचा अर्थ - एप्रिल, मे आणि जून
C अक्षराचा अर्थ - जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर
D अक्षराचा अर्थ - ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर इत्यादी.
आता समजा, तुमच्या LPG Cylinder वर A-23 लिहिलेलं असेल, तर तुमचा सिलेंडर जानेवारी ते मार्चपर्यंत चालू शकतो. याचा अर्थ, मार्च अखेरपर्यंत सिलेंडर एक्स्पायर होईल.
यामुळे लिहिली जाते एक्सपायरी डेट
साधारपणे एक सिलेंडर 15 वर्षापर्यंत वापरता येऊ शकतं. या काळामध्ये त्याची 2 वेळा टेस्टिंग केली जाते. याची पहिली टेस्टिंग 10 वर्षानंतर आणि दुसरी टेस्टिंग 5 वर्षानंतर केली जाते. पण बहुतेकजणांना हे माहिती नसते की, सिलेंडरवर लिहिलेली एक्स्पायरी डेटच टेस्टिंग डेट असते. ही डेट संपल्यानंतर सिलेंडर पुन्हा टेस्टिंगसाठी पाठवला जातो. जेणेकरुन सिलेंडर पुन्हा वापरण्यासाठी योग्य आहे किंवा नाही, याची माहिती घेतली जाते.
इतर महत्वाच्या बातम्या :