LPG Cylinder Price : LPG च्या दरात मोठी कपात, गॅस सिलेंडर झाले स्वस्त! आता 'इतक्या' रुपयांत मिळणार
LPG Cylinder Price : एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात झाल्यामुळे जनसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलेंडरचे दर आता स्वस्त झाले आहेत.
LPG Cylinder Price : एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी एलपीजी सिलेंडरचे दर 198 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे महागाईचा दर कमी होण्यास मदत होईल. इंडियन ऑइलने 1 जुलै रोजी जाहीर केलेल्या किमतींनुसार, राजधानी दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर (LPG Commercial Cylinder Price) 198 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
जाणून घ्या आजचे नवे दर
दिल्लीत 30 जूनपर्यंत 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 2219 रुपयांना मिळत होता. ज्याची किंमत 1 जुलैपासून 2021 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये 2322 रुपयांच्या तुलनेत आता हा सिलिंडर 2140 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 2171.50 रुपयांवरून 1981 रुपयांवर, तर चेन्नईमध्ये 2373 रुपयांवरून 2186 रुपयांपर्यंत किंमत कमी झाली आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरमध्ये तेल कंपन्यांकडून कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. दिल्लीत 14.2 किलोचा गॅस सिलिंडर 1003 रुपयांना मिळत आहे.
200 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी
जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलेंडर 200 रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त 12 सिलिंडरपर्यंत उपलब्ध असेल. सरकारच्या या निर्णयाचा 9 कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे.
300 रुपयांहून अधिक कपात
यापूर्वी 1 जून रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाले होते. अशाप्रकारे गेल्या महिनाभरात सिलिंडरच्या दरात 300 रुपयांहून अधिक कपात झाली आहे. मे महिन्यात सिलिंडरचे दर 2354 रुपयांपर्यंत वाढले होते. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत अखेरचा बदल 19 मे रोजी करण्यात आला होता.
घरगुती एलपीजी ग्राहकांचे काय?
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी असलेल्या 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. याआधी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 19 मे रोजी दरवाढ करण्यात आली होती.
संबंधित बातम्या