Homemade Beauty Products : घरीच तयार करा 'हे' 4 ब्युटी प्रोडक्ट; नॅचरल लूक मिळवण्यासाठी होईल मदत!
Homemade Beauty Products : बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्ट्सऐवजी घरच्या घरी काही गोष्टी तुम्ही तयार करु शकता.
Homemade Beauty Products : सौंदर्य.. सौंदर्याच्या अनेक व्याख्या आहेत. त्यातल्या त्यात चेहऱ्याचं सौंदर्य जपण्यासाठी आपण सर्वचजण नेहमीच धडपडत असतो. सौंदर्य टिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. घरगुती उपायांपासून ते बाजारातील उत्पादनांपर्यंत अनेक गोष्टींचा वापर सुंदर दिसण्यासाठी केला जातो. अनेकदा बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट्सच्या साइड इफेक्ट्सचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर या केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा नियमित वापर केल्यामुळे आपलं नैसर्गिक सौंदर्य नष्ट होतं. अशातच आज आम्ही काही होममेड ब्युटी प्रोडक्ट्सबाबत सांगणार आहोत, जे तुमचं नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतील. जाणून घेऊया घरच्या घरी केमिकल नसलेले ब्युटी प्रोडक्ट्स तयार करण्याची पद्धत...
होममेड फाउंडेशन
जर तुम्ही दररोज फाउंडेशनचा वापर करत असाल तर बाजारातून विकत घेण्यापेक्षा घरच्या घरी तयार करू शकता. होममेड फाउंडेशन तयार करण्यासाठी 1 टिस्पून जोजोबा ऑइल, 1 टीस्पून आरारोट पावडर आणि 1 टीस्पून दालचिनी पावडर मिक्स करा. व्यवस्थित एकत्र केल्यानंतर फाउंडेशन कंटेनरमध्ये ठेवा. हे केमिकल फ्री फाउंडेशन फेसला नॅचरल लूक देण्यासाठी फायदेशीर ठरतं.
घरच्या घरी तयार करा आयलायनर
डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी तुम्ही घरीच काजळ किंवा आयलायनर तयार करू शकता. त्यासाठी काही बदाम घेऊन ते कोळशाप्रमाणे काळे होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर हे बदाम व्यवस्थित बारिक करून घ्या आणि त्यामध्ये थोडसं बदामाचं तेल मिक्स करून एक घट्ट पेस्ट तयार करा. हे तुम्ही आयलायनर म्हणून वापरू शकता.
नॅचरल लिप ग्लॉस
बाजारातील महागडे लिप ग्लॉस वापरण्याऐवजी घरी तयार केलेला नॅचरल लिप ग्लॉज वापरणं फायदेशीर ठरतं. लिप ग्लॉस तयार करण्यासाठी सर्वात आधी स्ट्रॉबेरी व्यवस्थित स्मॅश करून घ्या. त्यामध्ये 3 टेबलस्पून खोबऱ्याचं तेल आणि 2 टेबलस्पून ग्लिसरीन मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण लिप बामच्या कंटेनरमध्ये ओतून ठेवा. हे नॅचरल लिप ग्लॉस ओठ सुंदर आणि मुलायम करण्यासोबतच त्यांचे सौंदर्य वाढविण्यासही मदत करेल.
ब्लशर
ब्लशर गालांचं सौंदर्य वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतं. परंतु बाजारातून विकत आणण्याऐवजी तुम्ही घरीच ब्लशर तयार करू शकता. यासाठी सर्वात आधी 1/2 टीस्पून अरारोट पावडर घ्या. गुलाबी रंगासाठी त्यामध्ये 1/2 टीस्पून जास्वंदाच्या फूलाची पावडर एकत्र करा. त्यानंतर ते एका एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवून द्या आणि त्याचा वापर करा.
(अरारोट हा अरारोट वनस्पतीच्या मुळांपासून मिळणारा स्टार्च किंवा स्टार्चचा एक प्रकार आहे. अरारोट दिसायला पांढरी पावडर आहे. तसेच अरारोट ग्लूटन फ्री आहे.)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Winter Skin Care Tips : हिवाळ्यात ड्राय स्किनपासून अशी मिळवा सुटका
- Health Care Tips : पुरेशी झोप, लिंबू, कोमट पाणी... यासारख्या घरगुती उपायानं वजन होईल कमी
- चिंता वाढवणारी आकडेवारी; महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्यातही वाढतोय कोरोना
- Drugs Peddler ला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर 60 जणांचा हल्ला, पोलीस आणि जमावामध्ये धुमश्चक्री