Health Care Tips : पुरेशी झोप, लिंबू, कोमट पाणी... यासारख्या घरगुती उपायानं वजन होईल कमी
Health Care Tips : काही घरगुती उपायांनी वजन नियंत्रणात आणता येते.
Weight Loss Tips : वाढतं वजन फक्त तुमचे व्यक्तिमत्व खराब करत नाही तर यामुळे तुम्हाला अनेक रोगदेखील होऊ शकतात. हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढणे, पोटावर चरबी जमा होणे, पचन व्यवस्थित न होणे, लैंगिक समस्या व यासोबतच मानसिक तणाव इत्यादी वजन वाढण्याचे दुष्परिणाम आहेत. पण काही घरगुती उपायांनी वजन नियंत्रणात आणता येते.
लिंबू, मध आणि कोमट पाण्याचा उपाय
वजन कमी करण्यासाठी प्रभावी उपाय म्हणून दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस, एक चमचा मध व एक चिमूट काळी मिरी टाकून पाण्याचे सेवन करावे. लिंबू, मध आणि काळी मिरी असलेल्या या पाण्यात वजन कमी करणारे अनेक घटक असतात जे शरीरातील विषयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासदेखील मदत करतात.
ओव्याचे पाणी
ओवा पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. ओव्याचे पाणी सेवन केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते व या सोबतच पचन क्रिया देखील सुधारते. यासाठी काही ओवा रात्रभर एक वाटी पाण्यात भिजून ठेवावा व सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे.
ग्रीन टी
नियमितपणे ग्रीन टी चे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. त्यापैकीच एक आहे वजन कमी करणे. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी चे अनेक फायदे होतात. ग्रीन टी लठ्ठपणामुळे होणाऱ्या अनेक रोगांपासून संरक्षण करते.
संतुलित आहार
बारीक आणि सडपातळ होण्यासाठी अनेकदा लोक कमी खाणे सुरू करतात. परंतु आपण संतुलित आहार आणि योग्य प्रोटिन्स चे सेवन करून देखील बारीक होऊ शकता. आपल्या भोजनात प्रोटीन, हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करावा. एकाच वेळी जास्त खाऊ नये दिवसभरातून थोडे थोडे अन्न खावे. वजन कमी करण्यासाठी कधीही खाणे बंद करू नका. नेहमी संतुलित आहार घ्या.
पुरेशी झोप
अनेकदा पुरेशी झोप न घेणे लठ्ठपणा आणि अनेक रोगांचे कारण असू शकते. म्हणून वजन कमी करण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे पुरेशी झोप घ्यावी. कमीत कमी 7-8 तासांची झोप तुम्हाला पुरेसा आराम आणि मेंदूला शांती देते.
व्यायाम
वाढलेले वजन नियंत्रणात आणून आरोग्य निरोगी ठेवण्याकरीता व्यायाम करणे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. दररोज 30 मिनिटे व्यायाम व योग केल्याने शरीराची अनावश्यक चरबी जळून शरीरात नव उर्जेचा संचार होईल. म्हणून दररोज व्यायाम करण्याची सवय लावावी.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Weight Loss : रोज सकाळी प्या Garlic Water; झटपट कमी होईल वजन
Health Tips : शुद्ध तुपाचा आहारात समावेश केल्याने होतील 'हे' फायदे
Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? जाणून घ्या ग्रीन टी पिण्याचे फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )