Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचे संकेत भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रभारी प्रदीप रामचंदानी यांनी एबीपी माझा शी बोलताना दिले..
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक राहिले असतानाही अजूनही युती संदर्भात समन्वयक समितीची एकही बैठक पार पडली नसल्याने भारतीय जनता पार्टी 78 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती निवडणूक प्रभारी रामचंदानी यांनी दिली आहे
भारतीय जनता पार्टी शिवसेना यांची समन्वयक समिती गठित करून निवडणुकीसंदर्भात चर्चा अद्याप झाली नासल्याने भाजप पेचात पडले असून 78 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे
शिवसेने ओमी कलानी साई पक्ष यांच्यासोबत युती केल्याने भाजपने तटस्थ भूमिका घेत 78 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे
वरिष्ठ पातळीवर युतीत निवडणूक लढवण्याची तयारी केली असली तरी कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर मतभेद असल्याने भाजपची शिवसेनेशी युती होताना दिसत नाही
शिवसेने स्थानिक पातळीवर असलेल्या पक्षांसोबत युती केल्याने भाजप नाराज झाले असून नैसर्गिक युतीला शिवसेना जवळ करत नसल्याचा आरोप करत भाजप 78 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे
टीम ओमी कलानी ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली टीम आहे त्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही युती करू शकत नाही असे शिवसेनेला सांगितले होते तरीही शिवसेनेने त्यांच्यासोबत युती केली आहे
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भाजपने मोठ्या प्रमाणात साथ देत निवडून देण्यासाठी प्रयत्न केला आज आम्ही कुठेतरी कमी पडलोत अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत भविष्यात खासदार पुन्हा लोकसभेला उभा राहतील तेव्हा आम्ही अशाच पद्धतीची मदत करून त्यांना निवडून देऊ खासदारांना आम्ही निवडून दिले तेव्हा त्यांना असे वाटत नाही या निवडीमध्ये आमचा वाटा आहे त्यांना टी ओ के चा वाटा असल्याचे वाटत आहे
शिवसेनेसोबत युती करायला तयार आहोत स्थानिक पातळीवरील टीम ओमी कलानी, साई पक्ष यांना शिवसेनेने आम्हाला विचारात न घेता सोबत घेतले























