Drugs Peddler ला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर 60 जणांचा हल्ला, पोलीस आणि जमावामध्ये धुमश्चक्री
Delhi Violence: अंमली पदार्थ विक्रेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर 50 ते 60 जणांच्या जमावाने हल्ला केल्याच्याची घटना दिल्लीमध्ये घडली आहे.
Delhi Violence: अंमली पदार्थ विक्रेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर 50 ते 60 जणांच्या जमावाने हल्ला केल्याच्याची घटना दिल्लीमध्ये घडली आहे. शनिवारी सकाळी पोलीस आणि जमावामध्ये धुमश्चक्री झाली. यामध्ये चार पोलीस जखमी झाल्याचं वृत्त आहे. दिल्लीतल्या इंद्रपुरी परिसरात ही घटना घडली आहे. हल्लेखोरांपासून वाचण्यासाठी यावेळी पोलिसांनी गोळीबार केला आणि हा गोळीबार कॅमेऱ्यात कैद झालाय.
राजधानी दिल्लीतल्या इंद्रपुरी परिसरात पोलीस आणि जमावामध्ये शनिवारी धुमश्चक्री पाहायला मिळाली.यावेळी हल्ला करणाऱ्या जमावावर पोलिसांनी गोळीबार केला आणि हा गोळीबार कॅमेऱ्यात कैद झालाय. अंमली पदार्थ विक्रेता धर्मवीर पल्ला याला पकडण्यासाठी पोलीस येथे पोहोचले होते. यावेळी 50 ते 60 जणांच्या जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. प्रत्युत्तरदाखल पोलिसांनी जमावावर गोळीबार केला. दोन जण पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेत तर चार पोलीस कर्मचारी जमावाच्या हल्ल्यात जखमी आहेत. ASI राजेश, काँस्टेबल रिंकू आणि काँस्टेबल विनोद हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. पोलीस आणि जमावामध्ये धुमश्चक्री सुरु असताना अंमली पदार्थ विक्रेता धर्मवीर पल्ला हा पसार झालाय. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
शनिवारी सकाळी धर्मवीर पल्ला याला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांचं पथक आणि नारकोटिक्स पथक इंद्रपुरी परिसरात पोहचलं होतं. पोलिसांनी यावेळी धर्मवीर पल्ला याच्या घराला वेढा घातला होता. पण जमावाने अचानक पोलिसांवर दगडफेक कऱण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरदाखल पोलिसांनीही जमावावर गोळीबार केला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. यात धर्मवीर पल्ला याच्या एका नातेवाईकाचा समावेश असल्याचं समजेतय. जखमी झालेल्यांची नावे अमित आणि सोहैब असल्याचं समतेय. तर जमावाच्या हल्ल्यात चार पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांवर BL कपूर आणि राममनोहर लोहिया या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live