एक्स्प्लोर
'काठा पदरा'च्या डेनिम जीन्सची जोरात चर्चा, किंमत ऐकून थक्क व्हाल
डेनिमच्या विविध जीन्सचे प्रकार जसे स्किनी जीन्स, हाय वेस्ट, लो वेस्ट, मंकी वॉश असे प्रकार आपल्याला माहित आहेत.

मुंबई: फॅशनच्या नावाखाली कोण काय करेल हे सांगता येत नाही. कोण पँट फाडतं, तर कोणी शर्टला ठिगळं लावल्याचं आपण पाहिलं आहे. या फॅशनबाजीत कपड्यांच्या कंपन्या किंवा ब्रँडही मागे नसतात. डेनिमच्या विविध जीन्सचे प्रकार जसे स्किनी जीन्स, हाय वेस्ट, लो वेस्ट, मंकी वॉश असे प्रकार आपल्याला माहित आहेत. मात्र डेनिमने आता जी जीन्स आणली आहे, तिला फॅशन म्हणायचं, फाटकी जीन्स म्हणायचं की फाटून उरलेली जीन्स म्हणायचं असा प्रश्न आहे.
‘एक्स्ट्रीम कट आऊट’ ही नवी जीन्स डेनिमने आणली आहे. महत्त्वाचं म्हणजे या जीन्सची किंमत थोडी थोडकी नाही, तर 168 डॉलर म्हणजे जवळपास 11 हजार रुपये आहे. डेनिमची ही ‘एक्स्ट्रीम कट आऊट’ जीन्स सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. वरपासून खालीपर्यंत कापडच नाही, केवळ काठ दिसत असल्यामुळे कुणी याला काठापदराची जीन्स असं म्हटलंय, तर कुणी जीन्स कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. महत्त्वाचं म्हणजे 11 हजाराच्या या जीन्सचं वजन केवळ 20 ग्रॅम इतकंच आहे. या जीन्सला कंपनीने ‘रिलॅक्स फिट’ असंही म्हटलं आहे.
‘एक्स्ट्रीम कट आऊट’ ही नवी जीन्स डेनिमने आणली आहे. महत्त्वाचं म्हणजे या जीन्सची किंमत थोडी थोडकी नाही, तर 168 डॉलर म्हणजे जवळपास 11 हजार रुपये आहे. डेनिमची ही ‘एक्स्ट्रीम कट आऊट’ जीन्स सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. वरपासून खालीपर्यंत कापडच नाही, केवळ काठ दिसत असल्यामुळे कुणी याला काठापदराची जीन्स असं म्हटलंय, तर कुणी जीन्स कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. महत्त्वाचं म्हणजे 11 हजाराच्या या जीन्सचं वजन केवळ 20 ग्रॅम इतकंच आहे. या जीन्सला कंपनीने ‘रिलॅक्स फिट’ असंही म्हटलं आहे. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















