(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron Symptoms: अवघ्या 2 दिवसांत दिसू लागतात ओमायक्रॉनची लक्षणे, नव्या संशोधनाचा दावा!
Corona Symptoms : डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनुसार, विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर 5-6 दिवसांनी तुम्हाला लक्षणे जाणवू लागतात. मात्र, आता याबाबत एक नवीन संशोधन समोर आले आहे.
Corona Symptoms : कोरोना विषाणूची (Corona Virus) लागण झालेल्या आणि न झालेल्या प्रत्येकाच्या मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे संसर्ग झाल्यानंतर किती दिवसांनी त्याची लक्षणे दिसतात. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे किती दिवसात कळते आणि लक्षणे किती दिवसात येतात? याबाबत सुरुवातीपासूनच गोंधळाचे वातावरण आहे. वास्तविक, कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून त्यात बरेच बदल झाले आहेत.
डब्ल्यूएचओ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनुसार, विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर 5-6 दिवसांनी तुम्हाला लक्षणे जाणवू लागतात. मात्र, आता याबाबत एक नवीन संशोधन समोर आले आहे. अलीकडेच ब्रिटनमध्ये झालेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, आता कोरोनाची लक्षणे संसर्ग झाल्यानंतर 2 दिवसांनीच दिसू लागली आहेत.
संशोधन काय सांगते?
हे संशोधन नुकतेच लंडनमध्ये करण्यात आले आहे. ज्यामध्ये 36 जणांचा समावेश होता. यामध्ये 12 ते 29 वर्षे वयोगटातील लोकांना संसर्ग झाला होता. यात सामील लोकांना नाकातून कोरोना विषाणूची लागण झाली होती. या लोकांना 14 दिवस रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. या संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोनाची लक्षणे 5 व्या दिवशी शिखरावर असतात. त्यानंतर हा विषाणू नाकापर्यंत पोहोचतो. सर्वप्रथम, कोरोनाची लक्षणे घशात दिसतात. अभ्यासात असे म्हटले आहे की, कोरोना संसर्गामुळे नाकात विषाणूचा भार खूप वेगाने वाढतो.
2 दिवसात लक्षणे दिसू लागतात!
अभ्यासात असे म्हटले आहे की, कोरोना संसर्ग झाल्यानंतर 2 दिवसात व्हायरसची लक्षणे दिसू लागतात. यामध्ये आधी घशात त्रास होतो आणि नंतर नाकात विषाणूचा भार झपाट्याने वाढतो. संशोधनात असे म्हटले आहे की, ज्या लोकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत, त्यांची प्रतिकारशक्ती खूप मजबूत होती.
संशोधनात असे म्हटले आहे की, कोरोना विषाणू खूप वेगाने पसरतो आणि त्याची संसर्ग क्षमता देखील खूप जास्त आहे. त्याचा प्रभाव नाकामध्ये सर्वाधिक असतो, हा संसर्ग नाक आणि तोंडाद्वारे सर्वात सामान्य आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या :
- Covid-19 : Omicron variant दरम्यान, लवंग, मेथी आणि तुळस 'या' प्रकारे करा सेवन, घसादुखीही होईल दूर
- Omicron Variant: नखांचा रंग बदलणे असू शकते ओमायक्रॉनचे लक्षण, चुकूनही करू नका दुर्लक्ष!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )