Coffee For Hair Growth: केस खूप गळतायत? चमकही नाहीशी झालीय? मग तुमच्या समस्येवरचा एकच उपाय, कॉफी; 'या' 3 पद्धतींनी करा वापर
Coffee Benefits For Hair Growth: कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांचं संरक्षण करण्यास मदत करतात. कॉफीमध्ये असलेलं कॅफेन केस गळणं कमी करण्यासाठी आणि केसांच्या वाढीस मदत करतं.
Coffee For Hair Growth: जसा अनेकांना वेळेचा चहा लागतोच, तसाच काहींना वेळेला कॉफी (Coffee) लागतेच. कॉफी म्हणजे, अनेकांचा जीव की प्राण. काही लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात एक कप कॉफीने करतात. मूड रिफ्रेश करण्यासाठी कॉफी अत्यंत फायदेशीर ठरते. त्यासोबतच कॉफी त्वचा (Coffee For Skin) आणि केसांसाठी (Coffee Benefits For Hair Growth) गुणकारी आहे. केसांची वाढ (Hair Growth) होत नसेल, तर त्यासाठी तुम्ही कॉफीचा वापर करु शकता. तुम्हाला माहितीय का?
कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांचं संरक्षण करण्यास मदत करतात. कॉफीमध्ये असलेलं कॅफेन केस गळणं कमी करण्यासाठी आणि केसांच्या वाढीस मदत करतं. केसांना नियमितपणे कॉफी लावल्यानं केस लांब, दाट आणि मजबूत होतात. केस वाढवण्यासाठी तुम्ही कॉफीचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करू शकतात. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी कॉफी वापरण्याचे 3 सोपे उपाय सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर...
1. कॉफी आणि खोबऱ्याचं तेल (Coffee And Coconut Oil)
केसांच्या वाढीसाठी तुम्ही कॉफीमध्ये खोबरेल तेल मिसळून लावू शकता. यासाठी एका भांड्यात आवश्यकतेनुसार, खोबरेल तेल घ्या. त्यात एक चमचा कॉफी पावडर टाकून मिक्स करा. आता हे मिश्रण तुमच्या टाळूवर लावा आणि हलक्या हातानं मसाज करा. सुमारे 30 मिनिटं ते मिश्रण केसांना लावून ठेवा. त्यानंतर सौम्य शॅम्पूच्या मदतीनं केस धुवा. तुम्ही हे मिश्रण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता.
2. कॉफी आणि कोरफडीचा गर (Coffee And Aloe Vera)
तुम्ही कॉफीमध्ये कोरफडीचा गर मिक्स करून केसांना लावू शकता. यासाठी एका वाटीत 2 चमचे कोरफडीचा गर घ्या. त्यात एक चमचा कॉफी पावडर टाका आणि मिक्स करा. आता हे मिश्रण हळूहळू तुमच्या टाळूवर लावा आणि डोक्याला मसाज करा. सुमारे 30 मिनिटांनंतर, सौम्य शैम्पूनं केस धुवा. आठवड्यातून एकदा याचा वापर केल्यानं तुमचं केस गळणं कमी होईल. याव्यतिरिक्त, केस देखील लांब, दाट आणि चमकदार होतील.
3. कॉफीने केस धुवा (Wash Your Hair With Coffee)
केसांचं आरोग्य राखण्यासाठी कॉफीनं केस धुणं हा सर्वोत्तम उपाय आहे. यासाठी एका भांड्यात ब्लॅक कॉफी तयार करा आणि थंड करून घ्या. आता शॅम्पूच्या मदतीनं केस धुवा आणि केसांमधील पाणी पिळून घ्या. आता डोक्यावर हे मिश्रण ओता आणि हलक्या हातांनी मसाज करा. साधारण 20 मिनिटं केस पाण्यानं धुवा. तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा अशा प्रकारे केसांना कॉफी वापरू शकता. असं केल्यानं केसांची वाढ होण्यास मदत होईल. याशिवाय केस मऊ आणि चमकदार होतील.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Digital Dementia: तुमचं मुलंही 'डिजिटल डिमेंशिया'नं ग्रस्त तर नाही? वेळीच सावध राहा, काळजी घ्या!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )