एक्स्प्लोर

Child Health : मुलं नेहमी चिडचिड करतात? 'व्हिटॅमिन डी' ची कमतरता तर नाही ना? कमतरता कशी दूर कराल?

Child Health : मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे सुद्धा मुलांच्या शारीरिक विकासात अनेक समस्या उद्भवू शकतात

Child Health : आजकाल तुमचं मुल खूप चिडचिड करतं.. काय झालं? जेवत नाही का नीट? असे एक ना अनेक प्रश्न नातेवाईक किंवा शेजारच्यांकडून पालकांना हमखास विचारले जातात. पालकांनो.. मूल चिडचिड करण्यामागे नेमकं कारण काय आहे? ते आधी शोधून काढायला हवं. तुमच्या मुलांमध्ये 'व्हिटॅमिन डी' ची कमतरता तर नाही ना? हे जाणून घ्यायला हवं.. बालरोगतज्ज्ञांच्या मते,  मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे सुद्धा मुलांच्या शारीरिक विकासात अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मुलांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व अत्यंत आवश्यक आहे. व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये कोणती लक्षणे दिसतात? त्याची कमतरता कशी दूर करता येईल? हे जाणून घेऊया.

मुलांच्या विकासासाठी आवश्यक - व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी ला सनशाइन विटामिन म्हटले जाते, जे मुलांच्या विकासासाठी आवश्यक आहे. हाडे आणि स्नायूंच्या विकासात ते खूप महत्त्वाची भूमिका बजावते. त्याच्या कमतरतेमुळे मुलांच्या शारीरिक विकासात अडथळे निर्माण होतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुडदूस हा आजार मुलांमध्ये होतो, ज्यामध्ये हाडं कमकुवत आणि पातळ होतात. इतकंच नाही तर व्हिटॅमिन डी नर्सव सिस्टम आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी देखील खूप महत्वाचे आहे. त्यामुळे मुलांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता भासणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी महत्त्वाचे का आहे? मुलांमध्ये त्याची कमतरता कशी दूर करता येईल? हे जाणून घेऊया.

व्हिटॅमिन डी महत्वाचे का आहे?

शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण करण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे, जे हाडांसाठी खूप महत्वाचे आहे. परंतु व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, शरीरात कॅल्शियमची कमतरता असते, ज्यामुळे हायपोकॅल्सेमिया आणि पॅराथायरॉईड ग्रंथीच्या अतिक्रियाशीलतेमुळे हायपरपॅराथायरॉईडीझम होऊ शकतो. या दोन्ही स्थितींमध्ये थकवा, अशक्तपणा, नैराश्य आणि स्नायू कडक होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, कॅल्शियमची कमतरता संतुलित करण्यासाठी, तुमचं शरीर हाडांमधून कॅल्शियम घेण्यास सुरुवात करते आणि हाडांचे डिमिनेरलायझेशन वेगाने होऊ लागते. यामुळे प्रौढांमध्ये ऑस्टिओमॅलेशिया आणि मुलांमध्ये मुडदूस हा आजार होऊ शकतो. एवढेच नाही तर व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मूड बदलणे, नैराश्य येणे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

मुलांमध्ये 'व्हिटॅमिन डी' च्या कमतरतेची चिन्हे

थकवा
हाडांमध्ये वेदना
स्नायू कडक होणे
अशक्तपणा आणि वेदना
मूड स्विंग्स
नैराश्य
वाढ खुंटणे
कमकुवत प्रतिकारशक्ती
हार्मोनल असंतुलन
हाडे कमकुवत होणे किंवा वारंवार फ्रॅक्चर होणे
मुडदूस (कमकुवत, पातळ आणि वाकलेली हाडे)

'व्हिटॅमिन डी' च्या कमतरतेवर मात कशी करावी?

कडक उन्हामुळे आपण मुलांना नेहमी घरात ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत सूर्यप्रकाश आहे. म्हणून, मुलांना सकाळच्या सूर्यप्रकाशात किंवा संध्याकाळी उशिरा सूर्यप्रकाशात किमान 30 मिनिटे घालवण्यास सांगा. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ते सकाळी खेळू शकतात, जे त्यांच्यासाठी व्यायाम असेल. मात्र, या काळातही सनस्क्रीन वापरा. मुलांच्या आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध अन्न, जसे की अंड्यातील पिवळ बलक, मशरूम, दूध, संत्र्याचा रस आणि तृणधान्ये यासारख्या बऱ्याच पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी असतं. या पदार्थांचा देखील तुम्ही आहारात समावेश करू शकता. जर मुलांमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली असेल तर डॉक्टर त्याला व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला देऊ शकतात.

हेही वाचा>>>

Child Health : पालकांनो.. सुट्टीत मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवायचंय? तर फक्त हे काम करा, जाणून घ्या

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget