Bhau Beej Gifts 2022 : भाऊबीजेनिमित्त बहिणीला 'या' खास भेटवस्तू द्या, सणाचा आनंद द्विगुणित करा
Bhau Beej Gifts 2022 : भाऊबीज हा भावा-बहिणीच्या नातेसंबंधांना अधिक घट्ट करणारा दिवस. भावाने बहिणीबद्दल आणि बहिणीने भावाबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा दिवस.
Bhau Beej Gifts 2022 : भारतीय सण धार्मिक मान्यतांवर तर आधारित आहेतच, पण त्याचबरोबर प्रत्येक सणांना कुटुंब, नाती, प्रेम यांची देखील किनार आहे. कोणत्याही सणाच्या निमित्ताने कुटुंब मिळून सण साजरा करतात. असाच दिवाळीत साजरा केला जाणारा सण म्हणजेच भाऊबीज (Bhau Beej 2022). हा दिवाळीतला चौथा आणि शेवटचा दिवस असतो. यावर्षी भाऊबीज 26 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे.
भाऊबीज हा भावा-बहिणीच्या नातेसंबंधांना अधिक घट्ट करणारा दिवस. भावाने बहिणीबद्दल आणि बहिणीने भावाबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. याच दिवशी भाऊ-बहिण एकमेकांना भेटवस्तू देतात. त्यामुळे या भाऊबीजेला तुम्ही देखील तुमच्या लाडक्या बहिणीला भेटवस्तू देणार आहात तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काही खास गिफ्ट ऑप्शन्स घेऊन आलो आहोत. या भेटवस्तू नक्कीच तुमच्या भाऊबीजेचा आनंद द्विगुणित करतील.
1. आवडता ड्रेस
मुलींच्या वॉर्डरोबमध्ये कपड्यांची नेहमीच कमतरता असते. अशा वेळी तुम्हाला जर तुमच्या बहिणीला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही तिला छानसा एखादा ड्रेस गिफ्ट म्हणून देऊ शकता. यामुळे तुमची बहिण नक्कीच खुश होईल.
2. मेकअप किट
मुली दिसायला सुंदर तर असतातच. पण त्याचबरोबर त्यांनी जर मेकअप वापरला तर त्यांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. आणि हाच मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय जर हेच मेकअप किट तुम्ही त्यांना गिफ्ट म्हणून दिला तर त्यांचा आनंद अधिकच वाढेल.
3. स्मार्टवॉच
सध्याच्या काळात तरूणाईत स्मार्टवॉचची क्रेझ वाढली आहे. एकाच घड्याळात अनेक फिचर्स असल्यामुळे तसेच हेल्थशी संबंधित सुद्धा इतर गोष्टींची माहिती आपल्याला या स्मार्टवॉचमधून मिळते. त्यामुळे तरूणाईत फिटनेसबाबत या घड्याळाची विशेष मागणी आहे. तसेच, सणासुदीला अनेक शॉपिंग वेबसाईटवर ऑफर्स असतात. त्यामुळे तुम्ही स्मार्टवॉच हा देखील पर्याय निवडू शकता.
4. ज्वेलरी
दागिना हा स्त्रियांचा अलंकार असतो. यामध्ये त्यांचं सौंदर्य अधिकच खुलतं. यामध्येच तरूणाईची विशेष पसंती ऑक्सिडाईझ ज्वेलरीसाठी आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या बहिणीला छान असा ज्वेलरी सेट गिफ्ट करू शकता.
महत्वाच्या बातम्या :