एक्स्प्लोर

Bhaubeej Diwali 2022 : भावा-बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला सण म्हणजेच 'भाऊबीज'; वाचा यामागची परंपरा

Bhaubeej Diwali 2022 : भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला (Diwali) सण म्हणजे भाऊबीज.

Bhaubeej Diwali 2022 : भाऊबीज (Bhaubeej) हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा दिवाळीतला (Diwali 2022) चौथा आणि शेवटचा दिवस असतो. भाऊबीज (Bhaubeej) हा बहीण-भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस. वसुबारसपासून सुरू झालेल्या दिवाळीची भाऊबीजेला सांगता होते. या सणाला हिंदीत भाईदूज (Bhai Dooj) असं म्हणतात. 

भाऊ बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला (Diwali) सण म्हणजे भाऊबीज. यंदा भाऊबीजेचा सण 26 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात. 

अशी आहे आख्यायिका :

भाऊबीजेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीकडे म्हणजे यमीकडे जेवावयास गेले. यमीने त्याचे योग्यप्रकारे आदरातिथ्य केले. त्याला ओवाळले. त्या दिवसाची आठवण म्हणून ह्या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिथेच जेवावे अशी प्रथा आहे. ह्यावेळी बहिणीने भावाला ओवाळावे. भावाने तिला ओवाळणी घालावी. बहिणीनेही भावाला एखादी भेटवस्तू द्यावी, जेवणात भावाच्या आवडीचे पदार्थ करावेत. सख्खी बहीण नसलेल्यांनी चुलत, मावस, मामे, आत्ते अशा दूरच्या नात्यातील बहिणीकडे जाऊन ही भाऊबीज साजरी करावी.

पूजेची परंपरा 

भाऊबीजेच्या दिवशी बहीण सकाळी आंघोळ करून कुलदैवत, भगवान विष्णू किंवा श्री गणेशाची पूजा करते. या दिवशी बहीण भावाच्या हाताला कुंकू आणि तांदळाचा लेप लावते, आणि त्यावर पाच विड्याची पाने, सुपारी आणि चांदीचे नाणे ठेवते. नंतर भावाच्या हातावर धांगा बांधून पाणी शिंपडत भावाच्या दीर्घायुष्यासाठी मंत्राचा उच्चार करते. काही ठिकाणी, बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावत त्याला औक्षण करते, आणि भावाच्या मनगटावर धागा बांधते. मग ती तिच्या भावाला मिठाई भरवते. आणि दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात. भाऊबीजेला भावाचे औक्षण करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या ताटामध्ये कुंकू, फुले, अक्षता, सुपारी, विड्याची पाने, चांदीचे नाणे, नारळ, फुलांच्या माळा, मिठाई, धागा, केळी असावी. या सर्व गोष्टींशिवाय भाऊबीज हा सण अपूर्ण मानला जातो.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget