(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beauty : काय सांगता! नितळ, सुंदर त्वचेसाठी अभिनेत्री लावते स्वत:ची लाळ? जुना व्हिडीओ व्हायरल, यूजर्सही आश्चर्यचकित
Beauty Tips : रुपेरी पडद्यावरील अभिनेत्रीची त्वचा पाहून कोणालाही हेवा वाटेल. मात्र तिची स्कीन केअरची एक पद्धत इतकी विचित्र आहे की, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय
Beauty Tips : त्वरीत गोरेपणा, नितळ त्वचा आणि सुंदर दिसण्यासाठी आजकाल महिला विविध इंस्टंट ब्युटी प्रॉडक्टचा वापर करतात, ज्याच्या माध्यमातून महिलांना एलर्जी किंवा आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. (Actress Beauty Tips) अशात बॉलिवूडची एक अभिनेत्री अशी आहे, जी सुंदर आणि नितळ दिसण्यासाठी चक्क आपल्या चेहऱ्यावर स्वत:च्या तोंडातील लाळ लावते. हे अनेकांना वाचायला जरी थोडं घाण वाटत असलं तर हे खरंय.. तमन्ना भाटियाची (Tamanna Bhatia) त्वचा पाहून कोणालाही हेवा वाटेल. ती टिकवण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करत असली, तरी तिची एक पद्धत इतकी विचित्र आहे की ती ऐकूनच किळस येते. सध्या या संदर्भातील एक जुनी व्हिडीओ क्लिपा व्हायरल होतेय. ज्यानंतर यूजर्सकडून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.. जाणून घ्या..
अभिनेत्रीने त्वचेशी संबंधित एक सीक्रेट सांगितले...
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने नुकतेच तिच्या त्वचेशी संबंधित एक रहस्य सांगितले होते, जे एकीकडे आश्चर्यचकित करणारे होते, तर दुसरीकडे मनात किळस आणणारे होते. ही व्हिडीओ क्लिप जुनी असली तरी सोशल मीडियावर ती पुन्हा व्हायरल होत आहे. इतक्या दिवसानंतरही हा विचित्र ब्युटी हॅक अनेकांनी पहिल्यांदा ऐकला, तेव्हा त्यांनाही तेवढाच धक्कादायक वाटत होता. एका मुलाखतीदरम्यान तमन्नाने तिचे सौंदर्याचे रहस्य सांगितले होते. तिने सांगितले होते की, ती सकाळी चेहऱ्यावर स्वत:ची लाळ लावते. आणि यामागे तिने आपले तर्कही दिले.
View this post on Instagram
लाळेत पिंपल्स सुकवण्याची ताकद.. नेमकं काय म्हणाली तमन्ना?
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत त्वचेच्या काळजीशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देताना तमन्नाने सांगितले होते की, तिलाही पिंपल्स येतात आणि त्यावेळी तिचा संपूर्ण चेहरा लाल होतो. या उपायाबद्दल बोलताना ती पुढे म्हणाले, 'तुम्ही विचाराल की मी माझ्या चेहऱ्यावर लावलेली सर्वात विचित्र गोष्ट कोणती आहे, तर उत्तर आहे माझी स्वतःची लाळ. जी सकाळी उठल्यानंतर तोंडात असते. त्यात पिंपल्स सुकवण्याची ताकद आहे. मला माहित आहे की ते थोडे किळसवाणं वाटेल, परंतु ते खरोखर कार्य करते. तमन्नाने पुढे सल्ला दिला की, जर त्वचेच्या समस्या कायम राहिल्या तर महिलांनी स्वतःचे उपाय करण्याऐवजी वैद्यकीय व्यावसायिकांचा सल्ला घ्यावा.
लाळ लावावी की नाही?
याबाबत बोलायचं झालं तर काहींना प्रयत्न करायचा असेल तर काहींना नाही. तुमची निवड काय असेल हे फक्त तुम्हालाच माहित. पण ब्युटी तज्ज्ञांकडून एक सूचना असेल की, मुरुमांची म्हणजेच पिंपल्सची समस्या असेल तर त्याचे कारण शोधा आणि नंतर तज्ज्ञांच्या मदतीने योग्य उपचार करा.
हेही वाचा >>>
Beauty Secret : कियारा, करीना सारख्या अभिनेत्रींच्या ग्लोइंग स्कीनचे रहस्य माहित आहे? जाणून घ्या, एकदा ट्राय करा..
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय वापरण्यापूर्वी, तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्यावा)