Baba Vanga Prediction 2023 : एलियन्स हल्ल्यापासून ते त्सुनामीपर्यंत, 2023 साठी बाबा वेंगाची 'ही' भविष्यवाणी, जाणून घ्या
Baba Vanga Prediction 2023 : बल्गेरियाच्या बाबा वेंगा या प्रसिद्ध भविष्यवक्ता होत्या. 2023 या वर्षासाठी त्यांनी अनेक भाकित वर्तवले होते. 2023 या वर्षासाठी कोणती भविष्यवाणी केली? जाणून घ्या
Baba Vanga Prediction : 'नास्त्रेदमस वुमन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वेंगा यांच्या 2023 च्या भविष्यवाण्यांनी लोकांना घाबरवले आहे. बाबा वेंगा यांनी 2023 साठी केलेल्या भाकितांमध्ये पृथ्वीवर एलियन्सचा हल्ला, अणुहल्ला आणि त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून अशा प्रकारच्या काही भविष्यवाण्या केल्या आहेत.
बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली आणि ती खरी ठरली
बाबा वेंगा या बल्गेरियाचे रहिवासी होत्या. त्या जन्मापासूनच आंधळ्या होत्या. त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली होती. बाबा वेंगा यांनी बल्गेरियातील कोझुह पर्वताच्या रुपीट प्रदेशात आपले जीवन व्यतीत केले. त्या सर्वकाही अनुभवू शकत होत्या. बाबा वेंगा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी झाला. त्यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होते, जे नंतर बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट यासह अनेक भाकीत केले होते, जे खरे ठरले. 2023 हे वर्ष अनपेक्षित घटना आणि शोकांतिकेने भरलेले असेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. बाबा वेंगा यांनी अमेरिकेत झालेल्या 9/11 दहशतवादी हल्ल्याबाबत देखील भाकित वर्तवलं होतं. तसेच आफ्रिका-अमेरिकन वंशाचे बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील,असा अंदाज देखील बाबा वेंगा यांनी आधीच वर्तवला होता. इतकंच नाही तर कोरोना साधीच्या आजाराबाबत देखील बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली होती आणि ती खरी ठरली. त्यामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे.
2023 वर्षाची भविष्यवाणी
बल्गेरियाच्या बाबा बेंगा यांनी त्यांच्या मृत्यूच्या 26 वर्षांपूर्वीच्या तारखेची भविष्यवाणी केली होती, जी पूर्णपणे खरी ठरली. बाबा वेंगा यांच्या समर्थकांचा असा दावा आहे की, त्यांनी 9 नोव्हेंबर 2001 रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचा अंदाज आधीच वर्तवला होता. जर त्यांची भविष्यवाणी गांभीर्याने घेतली असती तर कदाचित अमेरिकेला आपल्या भूमीवर इतका मोठा हल्ला कधीच पाहायला मिळाला नसता. असे म्हणतात की, बाबा वेंगा यांनी सन 5079 पर्यंत भाकीत केले होते. त्यांच्या मतानुसार आपली पृथ्वीचा 5079 मध्ये नाश होईल. त्याच वेळी, बाबा वेंगा यांनी 2023 वर्षासाठी अनेक भविष्यवाण्या देखील केल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी पृथ्वीवर अंधार पसरण्याची आणि विनाशाची भविष्यवाणी केली आहे.
होऊ शकतो एलियन हल्ला
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीत असे म्हटले आहे की, पृथ्वीवर दुसऱ्या ग्रहावरून येणाऱ्या शक्तींचा हल्ला होऊ शकतो. ज्यात लाखो लोक मारले जातील. शास्त्रज्ञ, एलियन हल्ल्याचा अंदाज घेत आहेत. पृथ्वीवर एलियनचा हल्ला होऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. या हल्ल्यामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते.
पॉवर प्लांटमध्ये स्फोट
बाबा वेंगा यांनी भाकीत केले की, पॉवर प्लांटमधील स्फोटामुळे जगभरात विषारी ढग पसरू शकतात, ज्यामुळे संपूर्ण आशिया खंड गडद अंधारात बुडेल. यामुळे गंभीर आजाराने लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)