Amalaki Ekadashi 2022 : ‘आमलकी एकादशी’ला का केली जाते आवळ्याच्या झाडाची पूजा? वाचा पौराणिक कथा...
Amalaki Ekadashi 2022 : आवळ्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदातही आवळ्याला गुणकारी मानले गेले आहे. ‘आमलकी एकादशी’च्या दिवशी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशा या झाडाची पूजा केली जाते.
Amalaki Ekadashi 2022 : आमलकी एकादशी (Amalaki Ekadashi 2022) व्रताच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली भगवान विष्णूची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करून, त्याचे फळही खाल्ले जाते. भगवान विष्णूंनी या झाडाची उत्पत्ती केली असे मानून त्याचे वर्णन ‘दैवी वृक्ष’ म्हणून केले. यंदा अमलकी एकादशी 14 मार्च रोजी असणार आहे.
आवळ्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदातही आवळ्याला गुणकारी मानले गेले आहे. ‘आमलकी एकादशी’च्या दिवशी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशा या झाडाची पूजा केली जाते. अर्थात त्याचे महत्त्व आणि फायदे लोकांना कळावे यासाठी पूर्वीपासून ही एकादशी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मात्र, या मागे एक पौराणिक कथा देखील आहे. चला तर जाणून घेऊया..
आमलकी एकादशीची पौराणिक कथा
अमलकी एकादशीबद्दल एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते. या कथेनुसार विश्वाचे निर्माते भगवान ब्रह्मांनी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतर एके दिवशी भगवान विष्णू त्यांना प्रसन्न झाले. त्यांनी ब्रह्माजींना दर्शन दिले. इतक्या वर्षांच्या तपश्चर्येनंतर विष्णूंना समोर पाहून ब्रह्मदेव भावूक झाले. त्यांच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू आले. त्या अश्रूंमधून आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली.
हे पाहून भगवान विष्णू म्हणाले की, तुझ्या अश्रूंपासून या झाडाचा जन्म झाला आहे, म्हणून हे झाड आणि त्याचे फळ मला प्रिय आहे. हा एक दैवी वृक्ष आहे, ज्यामध्ये सर्व देवता वास करतील. श्री विष्णू म्हणाले की, आजपासून जो कोणी फाल्गुन शुक्ल एकादशीला या झाडाची पूजा करेल, त्याला मी प्रसन्न होईन.
(टीप : सदर माहिती पौराणिक कथेवर आधारित असून, यातून कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)
महत्वाच्या बातम्या :
- Holi 2022 : रंगाच्या भीतीने होळी खेळणं टाळताय? चेहरा, केस आणि अंगावरील होळीचा रंग कसा काढायचा? वापरा 'या' टिप्स
- Holi 2022 : रंगपंचमीच्या एक दिवस आधी का केले जाते होलिका दहन? जाणून घ्या यामागची कथा...
- Important Days in March 2022 : मार्च महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha