(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : निरोगी हाडांसाठी ही 5 फळं तुमच्यासाठी वरदान; आजपासूनच आहारात समावेश करा
Health Tips : पोषणाचा अभाव आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे आपली हाडं अशक्त होतात.
Health Tips : आपल्या निरोगी आरोग्यासाठी निरोगी शरीर असणं फार गरजेचं आहे. अशातच शरीरातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हाडे. हाडे हा भक्कम शरीराचा पाया असतो. शरीराच्या जडणघडणीपासून ते चालणे, उठणे, बसणे, फिरणे अशा प्रत्येक गोष्टीत हाडं फार महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, पोषणाचा अभाव आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे आपली हाडं अशक्त होतात. या हाडांना मजबूत करण्यासाठी, फळं फार महत्त्वाची भूमिक बजावतात. फळं हाडांच्या रोगापासून संरक्षण करतात.
ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टियोपेनिया, पेजेट रोग, ऑस्टियोजेनेसिस इम्परफेक्टा, ऑस्टियोनेक्रोसिस, ऑस्टियोआर्थरायटिस, ऑस्टियोमायलिटिस, तंतुमय डिसप्लेसिया, हाडांचा कर्करोग आणि ट्यूमर, ऑस्टियोमॅलेशिया, मुडदूस, प्रकार 1 मधुमेह, सिलेआइटिस, सिलेआइटिस ही काही हाडांच्या रोगांची नावे आहेत ज्याचा त्रास मानवी शरीराला होतो. या त्रासापासून जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही काही फळांचं सेवन करणं गरजेचं आहे.
फळांचं सेवन करा
हाडे दुखणे, फ्रॅक्चरचा धोका, संसर्ग, पाठदुखी, सांधेदुखी यापासून सुटका हवी असेल तर हाडे मजबूत करणारे पदार्थ खा. या आरोग्यदायी फळांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आढळते.
अंजीर
अंजीरमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम असते, जे रिकेट्सपासून संरक्षण करते. हार्वर्डच्या मते, 2 फळांमध्ये 65 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. याबरोबरच तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन-के देखील कमी होत नाही.
सफरचंद
रोज एक सफरचंद खाल्ल्याने केवळ आजारच नाही तर कमकुवत हाडे देखील मजबूत होऊ शकतात. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मॅंगनीज असते, ज्यामुळे हाडांची घनता वाढते.
केळी
केळी ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियोपेनियापासून बचाव करू शकतात. त्यात प्रीबायोटिक असते, जे कॅल्शियमचे शोषण वाढवते. केळी खाल्ल्याने सांध्यांमधून आवाज येत नाही किंवा हाडे दुखण्याच्या तक्रारी दूर होतात.
संत्री
फोर्टिफाईड संत्र्याचा रस बाजारात सहज उपलब्ध असतो. त्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फोलेटसह व्हिटॅमिन डी समाविष्ट आहे. हाडांच्या कमकुवतपणापासून संरक्षण करण्यासाठी संत्री खूप महत्वाची असतात.
अननस
अननस खाल्ल्याने ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टियोपेनिया, ऑस्टियोआर्थरायटिस इत्यादी आजार टाळता येतात. त्यात आवश्यक कॅल्शियम, मॅंगनीज आणि इतर खनिजे असतात. या आंबट फळातून तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी मिळते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा