Fitness Tips : थोडा व्यायाम केल्यानेही तुम्हाला थकवा जाणवतो का? चिंता करू नका; आजच आहारात 'या' 4 सुपरफूड्सचा समावेश करा
Food That Boost Stamina : शारीरिक हालचालींव्यतिरिक्त, आपल्याला आतून पोषण देण्याची देखील खूप आवश्यकता आहे.अशा वेळी सुपरफूड्स फाय उपयोगी ठरतात.

Food That Boost Stamina : आपला स्टॅमिना जितका जास्त असतो तितकेच आपण उत्साही दिसतो. हा उत्साह आपल्याला आपल्या कामातूनही दिसतो. अशा परिस्थितीत अनेक जण आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात. परंतु, अनेकवेळा व्यायाम करूनही त्यांचे शरीर थकलेले राहते आणि त्यांना खूप अशक्तपणा जाणवू लागतो. अशा परिस्थितीत, शारीरिक हालचालींव्यतिरिक्त, आपल्याला आतून पोषण देण्याची देखील खूप आवश्यकता आहे. चला तर मग आपण अशा चार सुपरफूड्सबद्दल जाणून घेऊयात जे स्टॅमिना वाढविण्यास मदत करतात.
स्टॅमिना वाढविणारे 'हे' आहेत सुपरफूड्स
केळी
वर्कआउटच्या आधी किंवा नंतर केळी खाल्ल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात, ज्यामुळे तुम्हाला झटपट ऊर्जा मिळते आणि तुमचा थकवा दूर होतो. एवढेच नाही तर केळी खाल्ल्याने वजनही कमी होते आणि दुधासोबत सेवन केल्यास वजन वाढवण्यातही फायदा होतो.
क्विनोआ
क्विनोआ हे एक सुपरफूड आहे जे तुम्ही अनेक प्रकारे वापरू शकता. तुम्ही क्विनोआ पुडिंग बनवू शकता किंवा क्विनोआ सॅलड बनवून त्याचे सेवन करू शकता. हे संपूर्ण धान्य अन्न आहे, जे शरीराची सहनशक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच दिर्घकालीन आजारांचा धोका यामुळे कमी होतो. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असल्याने ते तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जावान ठेवण्यास मदत करते.
डाळींचे सेवन करा
कोणत्याही प्रकारची डाळ जसे- मूग डाळ, राजमा, चण्याच्या डाळीचे सेवन करा. यामध्ये प्रथिने, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असते. हे तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. याबरोबरच यातून शरीराला प्रोटीनही मिळतं. अशा प्रकारे, तुम्ही दररोज डाळींंचे सेवन करू शकता.
ड्रायफ्रूट्स
बदाम, अक्रोड, चिया सीड्स, सूर्यफुलाच्या बिया यांसारखे ड्रायफ्रूट्स आणि बिया सहनशक्ती वाढवण्यास मदत करतात. यामधून तुमचे फॅटही जास्त वाढत नाही. हे पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढते. तुम्ही ड्रायफ्रूट्स आणि बिया एकत्र करून त्यांचा प्रोटीन बार बनवू शकता आणि त्याचे सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला झटपट एनर्जी मिळेल.
जर तुम्ही या सुपरफूड्सचा वापर तुमच्या आहारात केला तर तुम्हाला देखील खूप उत्साही वाटेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
