(Source: ECI/ABP News/ABP Majha)
12th June 2022 Important Events : 12 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
12th June 2022 Important Events : जून महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या.
12th June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 12 जून चे दिनविशेष.
12 जून : बालकामगार विरोधी दिन (Anti-Child Labor Day)
जगामध्ये बालकांना कामगार म्हणून राबविले जाऊ नये आणि बालकांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळालाच पाहिजे. हा बालकामगार विरोधी दिनामागचा मुख्य उद्देश आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनाची सुरुवात आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) 12 जून 2002 रोजी केली. बाल कामगारांच्या जागतिक स्थितीवर लक्ष केंद्रित करणे आणि बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे या उद्देशाने जागतिक बालकामगार विरोधी दिन साजरा करण्यात येतो.
2000 : मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता पु.ल. देशपांडे यांचे निधन.
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुल हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार आणि पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या पुस्तकांची इंग्रजी आणि कन्नडसारख्या बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत. दूरदर्शन सुरू झाल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पहिली मुलाखत देशपांडे यांनी घेतली होती. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ 2002 साली त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले. त्यांना भारतातील चौथा आणि तिसरा सर्वोच्च पुरस्कार अनुक्रमे पद्मश्री (1966) आणि पद्मभूषण(1990) साली देण्यात आला.
1964 : वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते ‘नेल्सन मंडेला’ यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
1905 : गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.
1996 : साली भारतीय पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केलं.
2016 : साली प्रसिद्ध भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी ऑस्ट्रेलिया देशांतील सिडनी या ठिकाणी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेचे विजेते पद पटकाविले.
1894 : साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी प्राच्यविद्या संशोधक, बौद्ध धर्माचे अभ्यासक आणि पाली भाषेतील विद्वान साहित्यिक पुरुषोत्तम विश्वनाथ बापट यांचा जन्मदिन.
1976 : साली पद्मविभूषण पुरस्कार तसेच, संस्कृत साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारतीय संस्कृत-तंत्र अभ्यासक, भारतीय शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ गोपीनाथ कविराज यांचे निधन.
महत्वाच्या बातम्या :