(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SBI Recruitment 2023 : स्टेट बँकेत बंपर भरती, 8283 रिक्त जागा; सरकारी नोकरी मिळवण्याची संधी, लगेचच अर्ज करा
SBI Clerk Recruitment 2023 : भारतीय स्टेट बँकेकडून लिपिक पदांवर 8283 हून (Government Jobs) अधिक पदांसाठी भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज दाखल करावा.
SBI Vacancy 2023 : जर तुम्ही सरकारी बँकेत नोकरी (Government Bank Job) करण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. एसबीआयकडून 8 हजारहून अधिक पदांवर भरती (SBI Clerk Application Form 2023) करण्यात येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने लिपिक पदांसाठी बंपर भरती सुरु आहे. इच्छुक उमेदवार या बंपर भरतीसाठी अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अर्ज करू शकतात. भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांसाठी अर्ज नोंदणी सुरु झाली आहे, तुम्ही या संधीचा फायदा घ्या आणि वेळ न दवडता लगेचच अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करा.
SBI Clerk Recruitment 2023 : 8283 पदांवर बंपर भरती
या भरती अंतर्गत 8283 क्लर्क पदांवर भरती करण्यात येत आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने लिपिक पदांसाठी बंपर भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 17 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 डिसेंबर आहे. भरतीशी संबंधित सविस्तर माहिती जाणून घ्या.
SBI Clerk Recruitment 2023 : महत्त्वाच्या तारखा
- अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 17 नोव्हेंबर 2023
- अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 7 डिसेंबर 2023
SBI Clerk Recruitment 2023 : रिक्त जागांचा तपशील
या भरतीअंतर्गत लिपिक ज्युनियर असोसिएट्स ((Customer Support and Sales) च्या एकूण 8,283 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर 2023 आहे.
- एकूण रिक्त जागा : 8283
SBI Clerk Recruitment 2023 : परीक्षेच्या तारखा
SBI ची प्राथमिक परीक्षा जानेवारी 2024 मध्ये आणि मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये घेतली जाईल. दोन्ही परीक्षांच्या नेमक्या तारखा बँकेने अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. परीक्षेची तारीख नंतर कळवली जाईल.
SBI Clerk Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता आणि निकष
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावं.
SBI Clerk Recruitment 2023 : अर्ज फी
जनरल, OBC, EWS प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC, ST आणि इतर राखीव श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली असून त्यांना अर्ज शुल्क भरावं लागणार नाही.
SBI Clerk Recruitment 2023 : अर्ज कसा करावा?
- अधिकृत वेबसाइटला sbi.co.in वर जा.
- SBI Clerk Recruitment 2023 साठी अर्ज करण्यासाठी उपलब्ध लिंकवर क्लिक करा.
- नोंदणी करण्यासाठी तपशील अचूक भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
- अर्ज भरा आणि अर्ज फी भरा.
- अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :