स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये यंग प्रोफेशनल पदासाठी जागा; जाणून घ्या, अर्ज करण्याची प्रक्रिया
SAI recruitment 2022 : या भरती मोहिमेद्वारे, भारतीय क्रीडा प्राधिकरण यंग प्रोफेशनल पदासाठी भरती करेल.

SAI Vacancy 2022 : भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) ने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये यंग प्रोफेशनल पदासाठी भरती करणार आहे. अधिकृत वेबसाईट sportsauthorityofindia.gov.in वर जाऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जी 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत चालेल. उमेदवारांनी याची नोंद घ्यावी की, त्यांची निवड कंत्राटी पद्धतीनं केली जाईन.
रिक्त जागांचा तपशील
अधिसूचनेनुसार, लीगल डिपार्टमेंटमध्ये यंग प्रोफेशनल्सच्या 9 जागा भरल्या जातील
शैक्षणिक पात्रता
अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कायद्याची पदवी (LLB) उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय संबंधित क्षेत्रातील अनुभव असणंही आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
कशी होणार निवड?
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी चाचणी/मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
वेतनश्रेणी
निवड झालेल्या उमेदवारांना पगार म्हणून 50,000 रुपये दिले जातील.
अर्ज कसा करायचा?
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. 31 ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होईल, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 31 ऑक्टोबर, संध्याकाळी 5 वाजता
अर्ज प्रक्रिया शेवटची तारीख : 15 नोव्हेंबर, संध्याकाळी 5 वाजता
अर्ज कसा कराल?
राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेनं विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ज्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईट ibpsonline.ibps.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2022 आहे. तर अर्ज फी भरण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर आहे.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
NTPC मध्ये बंपर भरती, प्रतिमाह 1 लाखांहून अधिक वेतन मिळवण्याची संधी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
