एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

LinkedIn घेणार सुरक्षेची काळजी, आता होणार जॉब पोस्ट व्हेरिफिकेशन

LinkedIn Job Post Verification : LinkedInने आता नोकरीसाठी येणाऱ्या पोस्टसाठी व्हेरिफिकेशनची सेवा सुरु केली आहे. यामुळे आता नोकरीच्या शोधासाठी होणाऱ्या फसवणुकीवर आळा घालता येणार आहे.

LinkedIn Job Post Verification : आजकाल फसवणूक करण्यासाठी नोकरीचे आमिष सहज दाखवण्यात येते. व्हॅाट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि लिंक्डइन (LinkedIn) यांसारख्या सोशल मीडियावर नोकरीचे आमिष दाखवून व्यक्तिगत माहिती मिळवून फसवणुकीचे प्रकार सहज घडतात. त्यामुळे या नोकरीच्या फसवणुकीपासून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी लिंक्डइनने एक नवीन फीचर सुरु केले आहे. यामुळे जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरीसंबंधी योग्य ती माहिती उपलब्ध होऊ शकते.  लिंक्डइनने जॉब पोस्टसाठी व्हेरिफिकेशनची सेवा सुरु केली आहे. त्यामुळे आता जे लोक लिंक्डइनवर नोकरीच्या शोधात आहेत ते आता कोणत्याही कंपनीबद्दल व्हेरिफाईड माहिती जाणून घेऊ शकतात. त्यामुळे फसवणुकीचे प्रकार देखील कमी होण्यास मदत होईल. 

ज्या लोकांच्या प्रोफाईलवर See Verification डिटेल्स असा पर्याय येईल, ते लोक कंपनीकडून जे कोणी जॉब पोस्ट करत आहेत त्यांच्याविषयी जाणून घेऊ शकतात. तसेच या व्हेरिफिकेशनच्या सेवेमुळे तुम्हाला कंपनी आणि कंपनीशी संबंधित व्यक्तींचे वेरिफाइड ई-मेल किंवा त्यांच्या पेजविषयी माहिती मिळेल. नोकरी संबंधी पोस्ट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. या फीचरमुळे जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना आणि जे नोकरी संबंधी पोस्ट करत आहेत त्यांना दोघांनाही फायदा होण्यास मदत होईल. तसेच जे नोकरीच्या शोधात आहेत त्या लोकांना नोकरीच्या संबंधी विश्वास निर्माण होईल आणि जे नोकरी संबंधी पोस्ट करत आहेत त्यांना कंपनीबाबतीत विश्वासार्हता निर्माण करण्यास मदत होईल. 

नुकतेच सुरु झाले 'हे' फीचर

काही काळापूर्वी लिंक्डइनने 'About This Profile' हा पर्याय प्रोफाईल जोडण्यात आलेला होता. त्यामुळे लोकांना कोणत्याही प्रोफाईलविषयी सहज माहिती उपलब्ध होण्यास मदत होते. तसेच यामुळे फोन नंबर आणि ई-मेल व्हेरिफाईड आहेत की नाही हे देखील जाणून घेण्यास मदत होते. तसेच लिंक्डइनने 'Message Warning' अर्लट देखील सुरु केले आहे. त्यामुळे युजर्सना कोणत्याही प्रकारच्या खोट्या मेसेजपासून सुरक्षित राहता येईल. तसेच एखादी व्यक्ती इतर कोणत्या सोशल मीडियावर संवाद साधण्यास सांगत असेल तर  लिंक्डइन युजर्सना अशा प्रकारच्या मेसेजना रिपोर्ट करता येते. 

भारत लिंक्डइनच्या उद्योगासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. लिंक्डइन युजर्समध्ये अमेरिकेनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागत असून यामध्ये सुमारे 80 कोटी युजर्स आहेत. गेल्या तीन वर्षात भारतीय लिंक्डइन युजर्समध्ये च्या सदस्य संख्येमध्ये दरवर्षी सुमारे 2 कोटी युजर्सची वाढ झाली आहे. कोरोना महामारीच्या काळानंतर लिंक्डइनवर लोकांचा सहभाग आणि परस्पर संवादात वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

WhatsApp Edit Message Feature : व्हॉट्सअॅपवर चुकीचा किंवा अपूर्ण मेसेज आता करता येणार एडिट!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget