Job Majha : पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज
Job Majha : पुणे महानगरपालिकेमध्ये 113 आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 126 पदांसाठी भरती सुरू आहे.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या कदंबा परिवहन कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा या ठिकाणी विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात.
पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध पदांसाठी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तरपणे,
पुणे महानगरपालिका
यात वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी अध्यापक वर्गांची पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विविध पदांच्या 113 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता - MD/MS/DNB, 3 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 7
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022
तपशील - www.pmc.gov.in
पोस्ट - सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता - MD/MS/DNB, 5 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 12
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022
तपशील - www.pmc.gov.in
पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता - MD/MS/DNB, 1 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 31
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022
तपशील - www.pmc.gov.in
पोस्ट - ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर
शैक्षणिक पात्रता - MBBS
एकूण जागा - 16
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022
तपशील - www.pmc.gov.in
पोस्ट - सिनियर रेसिडेंट
शैक्षणिक पात्रता - MD/MS/DNB
एकूण जागा - 12
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022
तपशील - www.pmc.gov.in
पोस्ट - ज्युनियर रेसिडेंट
शैक्षणिक पात्रता - MBBS
एकूण जागा - 30
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022
तपशील - www.pmc.gov.in
पोस्ट - अपघात वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता - MBBS, 5 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 3
नोकरीचं ठिकाण - पुणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जुलै 2022
तपशील - www.pmc.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर सेवा भरतीवर क्लिक करा. विभागाचे नाव- वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यातल्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता - संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/ B.E./B.Tech./M.E./M.Tech./B.Pharm/NET/SET
एकूण जागा- 126
नोकरीचं ठिकाण - नागपूर
थेट मुलाखत - 6 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2022
मुलाखतीचं ठिकाण - द रजिस्ट्रार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय बिल्डिंग, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, अंबाझरी टी पॉईंट मार्ग, नागपूर- 440 033
तपशील - nagpuruniversity.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर advertisement / employment notices यावर क्लिक करा. Advertisement (Walk-in-Interview) for appointment of teachers on contract basis (2022-2023) या लिंकमधल्या detailed advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)