Job Majha : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, महावितरण येथे नोकरीच्या संधी, लवकर करा अर्ज
Job Majha : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, महावितरण या ठिकाणी भरती सुरू असून त्यासाठी अर्ज कसा करायचा, काय पात्रता आहे याची सविस्तर माहिती
![Job Majha : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, महावितरण येथे नोकरीच्या संधी, लवकर करा अर्ज Job Majha Jobs Opportunities at Steel Authority of India, Mahavitaran Apply Soon Job Majha : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, महावितरण येथे नोकरीच्या संधी, लवकर करा अर्ज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/05/21b5716c31188d0d705d1d25e243d8f01659695375_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. (SAIL)
विविध पदांच्य 200 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - मेडिकल अटेंडंट ट्रेनिंग
- शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण
- एकूण जागा - 100
- वयोमर्यादा - 18 ते 35 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2022
- तपशील - www.sail.co.in
पोस्ट - क्रिटीकल केअर नर्सिंग ट्रेनिंग
- शैक्षणिक पात्रता - GNM/B.Sc (नर्सिंग), १ वर्षाचा अनुभव
- एकूण जागा - 20
- वयोमर्यादा - 18 ते 35 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2022
- तपशील - www.sail.co.in
पोस्ट - अॅडवान्स स्पेशलाईज्ड नर्सिंग ट्रेनिंग (ASNT)
- शैक्षणिक पात्रता - GNM/B.Sc (नर्सिंग)
- एकूण जागा - 40
- वयोमर्यादा - 18 ते 35 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2022
- तपशील - www.sail.co.in
पोस्ट - डेटा एन्ट्री ऑपरेटर/मेडिकल ट्रान्सक्रिप्शन ट्रेनिंग
- शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण, PGDCA
- एकूण जागा - 06
- वयोमर्यादा - 18 ते 35 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2022
- तपशील - www.sail.co.in
पोस्ट - मेडिकल लॅब टेक्निशियन ट्रेनिंग
- शैक्षणिक पात्रता - DMLT
- एकूण जागा - 10
- वयोमर्यादा - 18 ते 35 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2022
- तपशील - www.sail.co.in
पोस्ट - हॉस्पिटल अॅडमिन ट्रेनिंग
- शैक्षणिक पात्रता - MBA/BBA/हॉस्पिटल मॅनेजमेंट/ हॉस्पिटल एडमिन पदवी/PG डिप्लोमा
- एकूण जागा - 10
- वयोमर्यादा - 18 ते 35 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2022
- तपशील - www.sail.co.in
पोस्ट - OT/ ऍनेस्थेशिया असिस्टंट ट्रेनिंग
- शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, हॉस्पिटल अटेंडंट/ ऍनेस्थेशिया अटेंडंट ट्रेनिंग
- एकूण जागा - 05
- वयोमर्यादा - 18 ते 35 वर्ष
- यासोबतच ॲडवान्स फिजिओथेरेपी ट्रेनिंग, रेडिओग्राफर ट्रेनिंग, फार्मासिस्ट ट्रेनिंग यासाठीही भरती होत आहे. प्रत्येकी तीन जागा आहेत. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2022
- तपशील - www.sail.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. •RSP-ADVERTISEMENT FOR MEDICAL TRAINING AT ISPAT GENERAL HOSPITAL, ROURKELA या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महावितरण, वाशीम
प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - इलेक्ट्रिशियन, वायरमन, कोपा प्रशिक्षणार्थी
- शैक्षणिक पात्रता - 12 वी पास, ITI उत्तीर्ण
- एकूण जागा - 75 (यात इलेक्ट्रिशियनसाठी 33 जागा, वायरमनसाठी 33 जागा, कोपासाठी 9 जागा आहेत.
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2022
- तपशील - www.mahadiscom.in
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)