Job Majha : कंस्ट्रक्शनपासून ते इलेक्ट्रिकल विभागात नोकरीची संधी, वाचा डिटेल्स
Job Majha: नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. भरती कुठे आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती....
Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन, बंगाल इंजिनिअर ग्रुप अँड सेंटरमध्येही नोकरीची संधी आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज कुठे करायचा आणि त्यासाठी पात्रता काय आहे याची माहिती खालीलप्रमाणे...
नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC)
विविध पदांच्या 81 जागांसाठी ही भरती होत आहे.
पहिली पोस्ट – ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा – 60
वयोमर्यादा – 28 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2022
तपशील - www.nbccindia.com
दुसरी पोस्ट – ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा – 20
वयोमर्यादा – 28 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2022
तपशील - www.nbccindia.com
तिसरी पोस्ट - डेप्युटी जनरल मॅनेजर (सिव्हिल)
शैणक्षिक पात्रता - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी, 9 वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 1
वयोमर्यादा – 46 वर्षांपर्यंत
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2022
तपशील - www.nbccindia.com (या वेबसाईटवर गेल्यावर human resources मध्ये career मध्ये career @NBCC वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. File download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
बंगाल इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, रूरकी
विविध पदांच्या 52 जागांसाठी ही भरती होत आहे.
पोस्ट – निम्न श्रेणी लिपिक (LDC), स्टोअर किपर ग्रेड- III
शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण
या दोन पदांसाठी एकूण जागा आहेत – 7
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2022
तपशील- https://indianarmy.nic.in/
उर्वरित 45 जागांसाठी पोस्ट आहेत….सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर, कुक, MTS (वॉचमन), MTS (गार्डनर), MTS (सफाईवाला), लास्कर, वॉशरमन, बार्बर
शैक्षणिक पात्रता - सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टरसाठी 10वी उत्तीर्ण, ITI, कुकसाठी 10वी उत्तीर्ण आणि भारतीय स्वयंपाकाचं ज्ञान आणि उर्वरित पदांसाठी 10वी उत्तीर्ण ही पात्रता हवी.
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष
अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Commandant, Bengal Engineer Group and Center, Roorkee, Haridwar, Uttarakhand- 247667
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2022
तपशील - https://indianarmy.nic.in/
श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड
पोस्ट – अधिकारी
शैक्षणिक पात्रता – पदवीधर/ पदव्युत्तर पदवी (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
एकूण जागा – 7
नोकरीचं ठिकाण – बीड
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट - https://shahubank.com/index (या वेबसाईटवर गेल्यावर stay connected मध्ये careers वर क्लिक करा. Advertisement for officer यावर क्लिक केल्यावर तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
संबंधित बातम्या :
- Air India Recruitment 2022 : दहावी, बारावी आणि पदवीधर तरुणांसाठी नामी संधी; 21 मार्चपर्यंत करा अर्ज
- Job Majha : परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी, अर्जासाठी उरले दोन दिवस
- Job Majha : मध्य रेल्वे, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि IBM नागपूर येथे नोकरीची संधी, पाहा डिटेल्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha